Crime : महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार, अश्लील व्हिडीओ, फोटो बनवून धमकावलं; सहकारी पुरुष अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

UP Crime News : महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोबत काम करणाऱ्या पुरुष कॉन्स्टेबल पीडित महिलेने आरोप केले आहे. या प्रकरणानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Crime News
Crime News x
Published On

Crime News : एका महिला कॉन्स्टेबलने तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यावर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. दोघेही डायल ११२ मध्ये एकत्र काम करतात. 'सहकारी पुरुष कॉन्स्टेबलने बलात्कार केल्यानंतर माझे अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार केले' असा आरोप महिला कॉन्स्टेबलने केला आहे. ही घटना उत्तरप्रदेशच्या कानपूर देहात जिल्ह्यामध्ये घडली आहे.

Crime News
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्या मृत्यूची अफवा, हृदयविकारानं निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल

पीडित महिला कॉन्स्टेबलने तिच्या सहकारी पुरुष कॉन्स्टेबलवर अनेक आरोप केले आहे. 'बलात्कार करण्यासोबत त्याने माझे अश्लील फोटो आणि व्हिडीओ देखील बनवले. याबाबत कोणाला काही सांगितले, तर तुला संपवेन अशी जीवे मारण्याची धमकी देखील दिली', असे पीडितेने म्हटले आहे. ही महिला कॉन्स्टेबल भदोही जिल्ह्यातील अकबरपूर येथील रहिवासी आहे.

Crime News
Cricket : एक-दोन नाही तर अनेक...; भारतीय खेळाडूचा पाय अजून खोलात, शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप

'मी दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करते, तर आरोपी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतो. तो (आरोपी) अनेकदा माझ्यावर अश्लील टिप्पणी करायचा. ड्युटी बदलत असताना वाईट हेतून मला स्पर्श करायचा. आरोपी अचानक माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यावर बलात्कार केला. माझे फोटो, व्हिडीओ बनवले. त्यानंतर हे फोटो, व्हिडीओ व्हायरल करायची धमकी दिली', असे पीडित महिला कॉन्स्टेबलने तक्रारीत म्हटले आहे.

Crime News
Maharashtra Politics : भास्कर जाधव विरोधी पक्षनेते होण्याआधीच भाजपमध्ये जाणार? संजय राऊत म्हणाले...

तक्रारीमध्ये महिला कॉन्स्टेबलने ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा आणि त्याच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती पीडितेने केली आहे. सध्या पीडित महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News
Kabaddi Player Death : प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू, कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणं जीवावर बेतलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com