Maharashtra Politics : भास्कर जाधव विरोधी पक्षनेते होण्याआधीच भाजपमध्ये जाणार? संजय राऊत म्हणाले...

Bhaskar Jadhav : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कोकणातील नेते भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते विरोधीपक्ष सोडून सत्ताधारी पक्षात जाणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. या चर्चांवर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On

Sanjay Raut : संजय राऊत यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाइट या कार्यक्रमाला भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांनी हिंदी भाषेशी संबंधित धोरण, ठाकरे बंधूंची युती अशा अनेक विषयांवर भाष्य केले. संजय राऊत यांना भास्कर जाधव यांच्याशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांची उत्तरे देताना संजय राऊत यांनी केलेल्या विधानांची चर्चा होत आहे.

Maharashtra Politics
Raj-Uddhav Thackeray Yuti: दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार; तारीख अन् ठिकाणही ठरलं

'भास्कर जाधव यांचं नाव दिलंय तुम्ही विरोधी पक्षनेते पदासाठी, पण महाराष्ट्राचा इतिहास आहे, विरोधी पक्षनेताच जातो सत्ताधारी पक्षासोबत... विरोधी पक्ष नेते होण्याआधीच भास्कर जाधव सत्ताधारी पक्षासोबत जात आहेत की काय? असे चित्र तयार झाले आहे', असे म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी 'भास्कर जाधव हे सकाळपासून आमच्यासोबतच होते', असे म्हटले.

संजय राऊत म्हणाले, 'पण काल विरोधीपक्षाच्या बैठकीला ते नसले. तरीही आज सकाळ ते आमच्या सोबत होते. ते जास्त वेळ त्यांच्या मतदारसंघात असतात, कोकणात असतात. पण आज सकाळपासून ते उद्धव ठाकरे साहेबांसोबत होते. आमच्यासोबत होते. कधीकधी ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे प्रशोभक वक्तव्य करतात. हे आम्ही सुद्धा पाहिलंय हे प्रत्येक पक्षात होतंय, अगदी भारतीय जनता पक्षात सुद्धा होत आहे. ऐकून घ्यायला हवं.'

Maharashtra Politics
Kabaddi Player Death : प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू, कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणं जीवावर बेतलं

भास्कर जाधव हे कोकणातील महत्त्वाचे नेते आहेत. अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांची वर्णी होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण मागील काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महाविकासआघाडीचे सरकार असताना मंत्रिपद न मिळाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली होती. त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली होती.

Maharashtra Politics
Dharashiv : बाप बनला हैवान, जन्मदात्या पित्यानेच कुऱ्हाडीचे घाव घालत पोटच्या लेकीला संपवलं; धाराशिव हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com