Dharashiv : बाप बनला हैवान, जन्मदात्या पित्यानेच कुऱ्हाडीचे घाव घालत पोटच्या लेकीला संपवलं; धाराशिव हादरलं

Dharashiv Crime : धाराशिवमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पोटच्या लेकीवर कुऱ्हाडीचे घाव घालत हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
dharashiv crime
dharashiv crimesaam tv
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

जन्मदात्या बापानेच कुऱ्हाडीचे घाव घालत पोटच्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये घडला आहे. आरोपीने मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह २४ तास घरात ठेवला होता. या प्रकरणी धाराशिवमधील आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याच्या माणिकनगर शेळगाव येथे हा भीषण प्रकार घडला आहे. मुलगी सतत आजारी पडत असल्याने आणि ती सायकलवरुन खाली पडल्याने रागाच्या भरात आरोपीने कुऱ्हाडीचे घाव घालत त्याच्या मुलीची हत्या केली. हत्येच्या वेळी आरोपी दारुच्या नशेमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

dharashiv crime
Kabaddi Player Death : प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू, कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणं जीवावर बेतलं

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर महादेव जाधव या व्यक्तीने त्याच्या नऊ वर्षांच्या मुलीला संपवले. त्याने कुऱ्हाडीने घाव घालत मुलीची हत्या केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह तब्बल २४ तास घरातच ठेवला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपीला अटक केली. आंबी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

dharashiv crime
Mumbai : बेपत्ता जोडप्याचा अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह आढळला; संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात?

लातूरमध्ये बापाने पोटच्या लेकीचा जीव घेतला.

लातूरच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे एका व्यक्तीने चार वर्षांच्या मुलीची गळफास देत हत्या केली. चॉकलेटसाठी पैसे मागितल्याच्या रागात या व्यक्तीने पोटच्या लेकीचा जीव घेतला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

dharashiv crime
Bigg Bossचं घर शापित? बिग बॉस स्पर्धकांचा अकाली मृत्यू? 9 स्पर्धकांच्या मृत्यूनं खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com