thomas jack draca 
Sports

IPL 2025 Mega Auction: इटलीचा हा स्टार IPL ऑक्शन गाजवणार! मुंबई इंडियन्ससोबत आहे खास कनेक्शन

IPL 2025 Mega Auction, Thomas Jack Draca: येत्या २४-२५ नोव्हेंबरला आयपीएल २०२५ स्पर्धेतील मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे.

Ankush Dhavre

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. आयपीएल कमिटीकडून लिलावाची तारीख आणि ठिकाणाची घोषणा करण्यात आली आहे. हा लिलाव सोहळा येत्या २४-२५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेद्दामध्ये रंगणार आहे.

या लिलावासाठी एकूण १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाईल. या लिलावासाठी किती कॅप्ड आणि किती अन्कॅप्ड खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे, याबाबत A to Z माहीती समोर आली आहे.

या लिलावासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघातील खेळाडूंसह इटलीच्या एका खेळाडूने देखील नाव नोंदवलं आहे. या खेळाडूचं नाव आहे, इटलीचा स्टार खेळाडू थॉमस जॅक ड्रॅका.

आयपीएल २०२५ स्पर्धेतील लिलावासाठी एकूण १६ देशातील खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतील सर्वाधिक ९१ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या ७६ आणि इंग्लंडच्या ५२ खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं आहे.

इटलीचा हा स्टार खेळाडू नक्की आहे तरी कोण?

आयपीएलमध्ये नाव नोंदवणारा हा गोलंदाज २४ वर्षांचा आहे. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गोलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

ईएसपीएनक्रीकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, या २४ वर्षीय गोलंदाजाने याच वर्षी इटलीसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४ सामन्यांमध्ये ८ गडी बाद केले आहेत.

यासह कॅनडामध्ये होणाऱ्या ग्लोबल टी-२० लीग स्पर्धेत तो ब्रम्पटने वूल्स संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. यासह आंतरराष्ट्रीय टी-२० लीग स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स एमिरेट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. यावरुन असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, मुंबई इंडियन्स आगामी हंगामात त्याला आपल्या ताफ्यात घेऊ शकते.

मुंबई इंडियन्सने या ५ खेळाडूंना केलं रिटेन:

मुंबई इंडियन्स - हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी),तिलक वर्मा (८ कोटी), जसप्रीत बुमराह (१८ कोटी),

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT