IND vs AUS: टीम इंडियाला BGT जिंकायचीये तर सुनील गावसकरांचा हा सल्ला ऐकावाच लागेल

Sunil Gavaskar On Team India: भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय खेळाडूंना मोलाचा सल्ला द्या.
IND vs AUS: टीम इंडियाला BGT जिंकायचीये तर सुनील गावसकरांचा हा सल्ला ऐकावाच लागेल
sunil gavaskartwitter
Published On

Sunil Gavaskar Advice To Team India: भारतीय संघाचा सर्वात कठीण दौरा येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

हा दौरा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकरांनी भारतीय फलंदाजांना मोलाचा सल्ला दिला आहे.

सराव सामने खेळा...

सुनील गावसकर म्हणाले, ' माझ्या मते, भारतीय खेळाडूंनी सराव सामने खेळायला हवे. कसोटी मालिका सुरु असतानाही त्यांनी सराव सामने खेळायला हवेत. हे संघातील सिनियर खेळाडूंसाठी तितकं महत्वाचं नाही, पण जे पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत, त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. यशस्वी, सरफराज आणि जुरेलसाठी सराव सामने खेळणं खूप महत्वाचं आहे. युवा खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर खेळण्याचा सराव करणं खूप गरजेचं आहे.'

IND vs AUS: टीम इंडियाला BGT जिंकायचीये तर सुनील गावसकरांचा हा सल्ला ऐकावाच लागेल
IND vs NZ: टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी कुठं? मास्टर ब्लास्टरने सांगितलं कारण

फलंदाजांसाठी मोलाचा सल्ला

तसेच ते पुढे म्हणाले की, ' जितकं शक्य होईल, फलंदाजांनी तितका सराव करावा. मला तरी वाटतं की, थ्रो डाऊनचा सामना करणं चांगलं असेल, पण गोलंदाजांचा सामना करणंही तितकंच महत्वाचं आहे. जसप्रीत बुमराहला वगळून तुम्ही इतर गोलंदाजांचा सामना करा. मात्र त्या गोलंदाजांना सांगा की, २२ ऐवजी २० यार्ड्सवरुन गोलंदाजी करा. त्यामुळे चेंडू आणखी वेगाने बॅटवर येईल.'

IND vs AUS: टीम इंडियाला BGT जिंकायचीये तर सुनील गावसकरांचा हा सल्ला ऐकावाच लागेल
Virat Kohli Birthday Special: किंग कोहलीचा 36 वा वाढदिवस! पाहा त्याचे 10 'विराट' रेकॉर्ड्स

भारताचा ३-० ने पराभव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह भारतीय संघाने मायदेशात खेळताना पहिल्यांदाच ३-० ने कसोटी मालिका गमावली. यापूर्वी २००० साली दक्षिण आफ्रिकेने भारतात खेळताना, भारतीय संघाला २-० ने धूळ चारली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com