Sunil Gavaskar: इंग्लंडचं 'बॅझबॉल', तर भारताचं...; रोहितसेनेसाठी गावसकरांनी सुचवले नवे नाव

Sunil Gavaskar On Rohit Sharma: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघासाठी नवं नाव सुचवलं आहे.
Sunil Gavaskar: इंग्लंडचं 'बॅझबॉल', तर भारताचं...; रोहितसेनेसाठी गावसकरांनी सुचवले नवे नाव
rohit sharmatwitter
Published On

Sunil Gavaskar Statement On Rohit Sharma: भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अडीच दिवस पावसामुळे धुतले गेले होते.

तरीही भारतीय फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली आणि हा सामना आपल्या नावावर केला. दरम्यान भारतीय फलंदाजांची ही आक्रमक फलंदाजी पाहून इंग्लंडच्या दिग्गजाने बॅझबॉल म्हटलं. आता भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय संघासाठी नवीन नाव सुचवलं आहे.

सुनील गावसकर यांच्या मते भारतीय संघाच्या विजयाचं संपूर्ण क्रेडिट रोहित शर्माला जातं. गावसकरांनी स्पोर्ट्सस्टारसाठी लिहिलेल्या एका कॉलममध्ये लिहिले की , ' फलंदाजी मजेशीर आणि ताजीतवानी होती, मात्र या फलंदाजीला जी नावं देण्यात आली ती जुनी होती. काहींनी याला गौतम गंभीरचा गेमबॉल असं म्हटलंय. आपण पाहिलंय की, इंग्लंडने बेन स्टोक्सच्या मार्गदर्शनाखाली फलंदाजी करण्याच्या पद्धतीत बदल केला होता. रोहित शर्मादेखील गेल्या काही वर्षांपासून अशीच फलंदाजी करतोय आणि संघालाही अशीच फलंदाजी करण्यासाठी प्रोत्साहित करतोय. '

Sunil Gavaskar: इंग्लंडचं 'बॅझबॉल', तर भारताचं...; रोहितसेनेसाठी गावसकरांनी सुचवले नवे नाव
IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

भारतीय संघाच्या विजयाचं क्रेडिट गौतम गंभीरला दिलं जात आहे. मात्र सुनील गावसकर याच्या विरोधात आहेत. त्यांचं म्हणणं आहे, ही तर गंभीरच्या प्रशिक्षणाची सुरुवात आहे. गंभीरने स्वतः कधी आक्रमक फलंदाजी केलेली नाही. त्यामुळे हे संपूर्ण क्रेडिट रोहित शर्माला जातं. यासह सुनील गावसकरांनी हा फलंदाजील शैलीला ' गोहित' असं नाव दिलंय.

Sunil Gavaskar: इंग्लंडचं 'बॅझबॉल', तर भारताचं...; रोहितसेनेसाठी गावसकरांनी सुचवले नवे नाव
SA vs IRE: आणखी एक मोठा उलटफेर! आयर्लंडने टी-२० नंतर वनडेतही दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

भारतीय संघाने बांगलादेशला २-० ने पराभूत केलं. आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध २ हात करण्यासाठी मैदानात उतरकणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com