IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Team indiatwitter

IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Team India Record, India vs Bangladesh 1st T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवताच भारतीय संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
Published on

India vs Bangladesh,1st T20I: ग्वालियरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंग - मयांक यादवची गती आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकिसमोर बांगलादेशची बत्ती गुल झाली. दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला.

या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी शानदार खेळ करत बांगलादेशचा ७ गडी राखून धुव्वा उडविला. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश संघाचा डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याने शेवटी वादळी खेळी करत भारतीय संघाला शानदार विजय मिळवून दिला. दरम्यान या विजयासह भारतीय संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

भारतीय संघाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

भारतीय संघाने बांगलादेशने दिलेलं आव्हान ४९ चेंडू शिल्लक ठेऊन आपल्या नावावर केला. यासह हा भारताचा १०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी भारतीय संघाने हा कारनामा झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना करून दाखवला होता. या सामन्यात भारताने १०० पेक्षा अधिक धावांचं आव्हान ४१ चेंडूत पूर्ण केलं होतं. तर अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ११६ धावांचा पाठलाग ३१ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केला आहे.

IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद; अश्विन, बुमराह आणि नेहरालाही सोडलं मागे

भारतीय संघाने टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेऊन जिंकलेले सामने

४९ चेंडू - विरुद्ध बांगलादेश, २०२४

४१ चेंडू - विरुद्ध बांगलादेश, २०१६

३१ चेंडू - विरुद्ध अफगाणिस्तान, २०१०

३० चेंडू - विरुद्ध झिम्बाब्वे, २०१०

IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
IND vs BAN: सूर्याचा मास्टरप्लान! पहिल्या सामन्यात या दोघांना पदार्पणाची संधी; पाहा Playing XI

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याने सर्वाधिक ३९ आणि सूर्यकुमार यादवने २९ धावांची खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com