SA vs IRE: आणखी एक मोठा उलटफेर! आयर्लंडने टी-२० नंतर वनडेतही दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

Ireland Beat South Africa: ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मोठा उलटफेर केला आहे.
SA vs IRE: आणखी एक मोठा उलटफेर! आयर्लंडने टी-२० नंतर वनडेतही दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ
south africatwitter
Published On

South Africa vs Ireland 3rd ODI: आयर्लंडने आणखी एक मोठा उलटफेर केला आहे. आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली.

तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेला ६९ धावांनी धूळ चारली आहे. यापूर्वी झालेल्या टी -२० मालिकेतही आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत इतिहास रचला होता.

दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव केला. मात्र तिसऱ्या सामन्यात आयर्लंडने दमदार कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडविला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, आयर्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने तुफानी फटकेबाजी करत ९ गडी बाद २८४ धावा केल्या. आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंगने सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि ३ षटकार खेचले. यासह हेरी टेक्टरने ४८ चेंडूत ६० धावांची खेळी केली.

SA vs IRE: आणखी एक मोठा उलटफेर! आयर्लंडने टी-२० नंतर वनडेतही दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ
IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

आयर्लंडने ठेवलेलं आव्हान हे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी फार मोठं नव्हतं. मात्र पाचव्या षटकातच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला. त्यानंतर लागोपाठ ३ विकेट्स पडल्या. २८५ धावांचा पाठलाग करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या २१५ धावांवर आटोपला. यासह आयर्लंडने हा सामना ६९ धावांनी आपल्या नावावर केला. मात्र आयर्लंडला ही मालिका २-१ ने गमवावी लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com