Afghanistan vs Ireland: आयर्लंडने रचला इतिहास; कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच जिंकला सामना

Afghanistan vs Ireland: आयरिश संघाने अबुधाबीच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्धची एक सामन्याची कसोटी मालिका ६ गडी राखून जिंकलीय. आयरिश संघाचा कसोटी क्रिकेटमधला हा पहिला विजय आहे.
Afghanistan vs Ireland
Afghanistan vs IrelandSaam Tv

Afghanistan vs Ireland Test Match Against Afghanistan:

आयर्लंडसाठी १ मार्चचा दिवस त्यांच्या क्रिकेट इतिहासातील अतिशय सस्मरणीय ठरला. आयरिश संघाने अबुधाबी येथील मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध एक सामन्याची कसोटी मालिका ६ गडी राखून जिंकली. आयर्लंडचा कसोटी क्रिकेटमधला हा पहिलाच विजय आहे. याआधी आयर्लंडच्या संघाने ७ कसोटी सामने खेळलेत. या सर्वांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलंय.(Latest News)

अफगाणिस्तानच्या संघाने आयर्लंडसमोर विजयासाठी १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिश संघाच्या १३ धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने प्रथम पॉल स्टर्लिंगसोबत चौथ्या विकेटसाठी २६ धावांची भागीदारी केली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर लोर्कन टकरसोबत ५व्या विकेटसाठी ७२ धावांची मॅचविनिंग भागीदारी करत संघाला ६ विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आयरिश संघाचा कर्णधार बालबर्नीने ९६ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. आयर्लंड संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नसल्याने बहुतेकवेळी ते फक्त १ सामन्यांची कसोटी मालिका खेळू शकतात. आतापर्यंत संघाने एकदाच श्रीलंकेविरुद्ध २ सामन्यांची कसोटी मालिका खेळलीय.

या सामन्यात आयर्लंड संघाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. जलदगती गोलंदाज मार्क अडायरने पहिल्या डावात ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही अडायरने ३ बळी घेतले. या सामन्यात अफगाणिस्तान संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही डावातील संघाची फलंदाजांची अत्यंत खराब राहिली. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला पहिल्या डावात केवळ १५५ धावा करता आल्या. तर दुसऱ्या डावात २१८ धावांपर्यंत मजल मारता आली.

Afghanistan vs Ireland
PSL Viral Photo: पाकिस्तानचं गणित पाहून जग हैराण! क्वेटा- कराची किंग्ज सामन्यातील विनिंग प्रेडिक्शनचं कॅलक्युलेशन Viral

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com