PSL Viral Photo: पाकिस्तानचं गणित पाहून जग हैराण! क्वेटा- कराची किंग्ज सामन्यातील विनिंग प्रेडिक्शनचं कॅलक्युलेशन Viral

Pakistan Super League News In Marathi: पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्या तंत्रज्ञानामुळे चर्चेत आली आहे. यावेळी निमित्त ठरलंय स्पर्धेतील विनिंग प्रेडिक्शन मीटर. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
psl technology gone wrong showing funny match prediction photo went viral
psl technology gone wrong showing funny match prediction photo went viral twitter
Published On

Pakistan Super League, Winning Prediction Meter:

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेतील DRS चा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये चेंडूची पिचिंग आणि हिटिंग याचा काहीच संबंध नसल्याचं दिसून आलं होतं. आता पुन्हा एकदा ही स्पर्धा आपल्या तंत्रज्ञानामुळे चर्चेत आली आहे. यावेळी निमित्त ठरलंय स्पर्धेतील विनिंग प्रेडिक्शन मीटर. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी होती. क्वेटा ग्लॅडिएटर्सला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ३ चेंडूत २ धावांची गरज होती. (Cricket news in marathi)

psl technology gone wrong showing funny match prediction photo went viral
IND vs ENG 5th Test: धरमशालेत रंगणार भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना! इथे कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड?

त्यावेळी स्क्रिनवर सामन्याचं विनिंग प्रेडिक्शन मीटर दाखवलं गेलं. ज्यात क्वेटा ग्लॅडिएटर्स हा सामना जिंकणार असल्याची शक्यता १०१ टक्के इतकी होती. तर कराची किंग्ज संघ हा सामना जिंकण्याची शक्यता -१ टक्के इतकी होती. या प्रेडिक्शनचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

psl technology gone wrong showing funny match prediction photo went viral
IND vs ENG: ध्रुव जुरेलच्या या खास प्लानमुळे जिंकली टीम इंडिया! सामन्यानंतर स्वतःच केला मोठा खुलासा

क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा शानदार विजय..

या सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या कराची किंग्ज संघाने २० षटकअखेर १६४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने शानदार विजय मिळवला. क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन देत ५७ धावा जोडल्या.

शेवटच्या षटकात लागला निकाल...

क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाला चांगली सुरुवात मिळाली मात्र त्यानंतर अवघ्या २० धावांत संघातील ५ फलंदाज माघारी परतले. शेवटी शेरफेन रुदरफोर्ड आणि अकील होसेनने दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com