PSL 2023: १४० किलोग्रॅम वजन असलेला हा पाक खेळाडू स्वतःला म्हणतोय सूर्यापेक्षा ग्रेट

आजम खान एक आक्रमक फलंदाज म्हणून नावारूपाला येत आहे. अनेकांनी त्याची तुलना सूर्यकुमार यादवसोबत केली आहे.
Suryakumar yadav
Suryakumar yadavSaam Tv
Published On

Azam khan: पाकिस्तान सुपर लीग २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या आजम खानने नुकताच तुफानी खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ४२ चेंडूंमध्ये ९७ धावांची खेळी केली आहे.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ९ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. ज्यावेळी संघाला आवश्यकता होती. त्यावेळी त्याने ही तुफानी खेळी केली आहे. आता या खेळीनंतर त्याची तुलना सूर्यकुमार यादवसोबत होऊ लागली आहे.(Latest Sports Updates)

आजम खान एक आक्रमक फलंदाज म्हणून नावारूपाला येत आहे. अनेकांनी त्याची तुलना सूर्यकुमार यादवसोबत केली आहे. यावर आजम खानचे म्हणणे आहे की,सूर्यकुमार यादव ज्यावेळी फलंदाजीला येतो त्यावेळी त्याच्यावर जास्त दबाव नसतो.

मात्र तो स्वतः दबावाच्या परिस्थितीत फलंदाजी करतो. मला त्याच्या फलंदाजीची भूमिका खूप चांगल्याप्रकारे माहित आहे. कारण आम्ही एकाच पोसिशनवर फलंदाजी करतो. सूर्यकुमार यादव हा वन डाऊनला फलंदाजीसाठी येतो.'

Suryakumar yadav
IND vs AUS : रोहित शर्माचं टेन्शन वाढवणारी बातमी; स्टीव्ह स्मिथने आखला मोठा प्लॅन, टीम इंडिया फसणार?

आजम खानला पाकिस्तान संघासाठी ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र जुलै २०२१ नंतर त्याला पाकिस्तान संघात पुनरागमन करता आले नाहीये. आजम खान हा १४० किलोग्रॅम वजनाचा आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतात.

त्याच्या फिटनेसवर टीका करणाऱ्यांना त्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्याने म्हटले की,' मी नको असलेल्या गोष्टींवर लक्ष देत नाही. तर पाकिस्तान संघात स्थान द्यायचं की नाही हे त्यांच्यावर आहे. मी चांगली कामगिरी करतोय. हे सर्वांना दिसतंय.'

Suryakumar yadav
PSL 2023: शाहीन आफ्रिदीचा कहर..पहिल्या चेंडूवर तोडली बॅट तर दुसऱ्याच चेंडूवर तोडला स्टंप: VIDEO

या सामन्यानंतर त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की,'तुम्हाला माहीतच आहे की, मी ज्या पोसिशनला फलंदाजी करतो त्या पोसिशनला दबाव असतो. संघाची धावसंख्या ४ गडी बाद ४० किंवा २ गडी वाद १६०-१८० असते. अशा परिस्थितीत जाऊन सामना फिनिश करायचा असतो. हे खूप कठीण काम आहे. मी टीम डेव्हिडला माझा आदर्श मानतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com