shaheen afridi
shaheen afridiSaam TV

PSL 2023: शाहीन आफ्रिदीचा कहर..पहिल्या चेंडूवर तोडली बॅट तर दुसऱ्याच चेंडूवर तोडला स्टंप: VIDEO

तो पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत पेशावर जाल्मी संघाविरुध्द झालेल्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करताना दिसून आला आहे
Published on

Shaheen Afridi PSL 2023: पाकिस्तान संघाचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या जोरदार कामगिरी करतोय. त्याने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत पेशावर जाल्मी संघाविरुध्द झालेल्या सामन्यात सुरवातीच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करताना दिसून आला आहे. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Sports Updates)

या स्पर्धेत लाहोर कलंदर्स संघाचे नेतृत्व करत असलेला शाहीन आफ्रिदी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करताना दिसून येत आहे. या षटकातील पहिल्याच चेंडूंवर त्याने मोहम्मद हॅरिसची बॅट तोडली. तर दुसऱ्याच चेंडूंवर त्याने हॅरिसच्या यष्ट्या उधळल्या.

shaheen afridi
IND vs AUS : रोहित शर्माचं टेन्शन वाढवणारी बातमी; स्टीव्ह स्मिथने आखला मोठा प्लॅन, टीम इंडिया फसणार?

तो इथेच थांबला नाही तर त्याने पुढे पेशावर जाल्मी संघाचा कर्णधार बाबर आजमला देखील त्रिफळाचित करत माघारी धाडले.

दोन महिने क्रिकेपासून दूर राहिलेल्या शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान संघासाठी आणि पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत पुनरागमन केले आहे. काही दिवसांपूर्वी तो दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. मात्र त्याने या स्पर्धेतून जोरदार पुनरागमन केले आहे. या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत १० गडी बाद केले आहेत.

shaheen afridi
IND Vs AUS 3rd Test: तिसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! कर्णधार पॅट कमिन्स बाहेर तर 'या' खेळाडूच्या हाती कर्णधारपदाची धुरा

शाहीनने या सामन्यात ४० धावा खर्च करत ५ गडी बाद केले. लाहोर संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ३ गडी बाद २४० धावा केल्या होत्या. तर धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पेशावर संघाला २०१ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com