Team India News: टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल? पाहा समीकरण

Team India Semi Final Scneario, ICC T20 World Cup 2024: भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं. मात्र अजूनही भारतीय संघाचं टेन्शन कमी झालेलं नाही. दरम्यान कसं असेल समीकरण? जाणून घ्या.
Team India News: टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल?  पाहा समीकरण
team indiatwitter
Published On

आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. इथून भारतीय संघाला पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत पराभूत करायचं होतं.

या जिद्दीने भारतीय संघ आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला. भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला खरा, पण अजूनही भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. इथून पुढे कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

भारतीय संघाने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. यापैकी एका सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. आता भारतीय संघाचे पुढील २ सामने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हे दोन्ही सामने कुठल्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहे. मात्र या दोघांपैकी एकही सामना गमावला, तर भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग कठीण होणार आहे.

Team India News: टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल?  पाहा समीकरण
IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद; अश्विन, बुमराह आणि नेहरालाही सोडलं मागे

पहिल्या सामना भारतीय संघाने गमावला, मात्र हा सामना मोठ्या फरकाने गमावला. याचा फटका भारतीय संघाला नेट रन रेटमध्ये बसला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडने १६० धावांचा डोंगर उभारला होता. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १०२ धावांवर आटोपला. हा सामना भारतीय संघाला ५८ धावांनी गमवावा लागला.

Team India News: टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल?  पाहा समीकरण
IND vs BAN: बांगलादेशला धूळ चारताच टीम इंडियाने रचला इतिहास! १७ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचा नेट रन रेट -२.९०० वर जाऊन पोहोचला. त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवण्याची गरज होती. भारतीय संघाने पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाकिस्तानला १०५ धावांवर रोखलं.

त्यामुळे भारतीय संघाकडे मोठा विजय मिळवून नेट रन रेटमध्ये भर घालण्याची संधी होती. मात्र भारतीय संघ असं करु शकला नाही. भारतीय संघाने हे आव्हान १८.५ षटकात पूर्ण केलं. या विजयामुळे भारतीय संघाचा नेट रन रेट -१.२१७ वर जाऊन पोहोचला. यासह १ सामना जिंकूनही भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com