IND vs NZ: टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी कुठं? मास्टर ब्लास्टरने सांगितलं कारण

Sachin Tendulkar On Team India Defeat: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवाचं नेमकं कारण काय?याबाबत सचिन तेंडुलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
IND vs NZ: टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी कुठं? मास्टर ब्लास्टरने सांगितलं कारण
shubman gill rishabh panttwitter
Published On

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारताने मायदेशात खेळताना पहिल्यांदाच ३-० ने कसोटी मालिका गमावली आहे.

भारतीय संघाने नेमकी काय चूक केली? कोणत्या चुका भारतीय संघाला महागात पडल्या? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासह त्याने शुभमन गिलचं कौतुक केलं आहे.

सचिन तेंडुलकरने एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणाला, ' मायदेशात खेळताना ३-० ने पराभूत होणं हे पचवणं खूप कठीण आहे. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं? की सामन्यासाठी तुम्हीच तयारच नव्हते. शुभमन गिलने पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली. रिषभ पंतने दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. या आव्हानात्मक खेळपट्टीवर त्याचा फुटवर्क शानदार होता.

IND vs NZ: टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी कुठं? मास्टर ब्लास्टरने सांगितलं कारण
IND vs VS NZ: जिव्हारी लागणारी हार! न्यूझीलंडच्या विजयाचे फटाके, टीम इंडियाच्या पराभवाचा आपटीबार, २४ वर्षानंतर मिळाला व्हाईटवॉश!

न्यूझीलंडविरुद्ध झालेला विजय हा भारतीयांसाठी न पचवणारा आहे. सचिन तेंडुलकरही या पराभवामुळे नाराज आहे. त्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंना या शानदार विजयाचं श्रेय दिलं आहे. या मालिकेतील पहिला सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला होता.

या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील दुसरा सामना भारताने ११३ धावांनी गमावला होता. आता मुंबईत पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला २५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

IND vs NZ: टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी कुठं? मास्टर ब्लास्टरने सांगितलं कारण
Ind vs Nz: टीम इंडिया सहज जिंकेल? वानखेडेवर धावांचा पाठलाग करणं कठीण, आकडे पाहून व्हाल हैराण

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली आणि रोहित शर्मा हे पूर्णपणे फ्लॉप ठरले. भारताकडून फलंदाजी करताना रिषभ पंतने सर्वाधिक २६१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३० चौकार आणि ८ षटकार खेचले. यासह १९० धावा करणारा यशस्वी जयस्वाल या मालिकेत दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यशस्वीने आपल्या खेळीदरम्यान २४ चौकार आणि ३ षटकार खेचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com