Sachin Tendulkar reaction : सरफराजच्या शतकानंतर सचिन तेंडुलकरलाही राहावलं नाही!,युवा खेळाडूंमध्ये उत्साह भरवणारी पोस्ट!

Sachin Tendulkar Reaction on Sarfaraz Khan Century : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघावर पहिल्या डावापासून पराभवाचे ढग जमा झाले असतानाच, दुसऱ्या डावात सरफराज खाननं टिच्चून फलंदाजी करत शतक झळकावलं आणि संघाला सावरलं. त्यावर सचिन तेंडुलकरलाही राहावलं नाही. त्यानं लय भारी प्रतिक्रिया दिली आहे.
Sarfaraz Khan Century Latest News
Sarfaraz Khan Century Latest News @bcci/X
Published On

न्यूझीलंडविरुद्ध सरफराज खान यानं आपल्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती, असं महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं म्हटलं आहे. बेंगळुरूत भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या सरफराजनं दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. आता भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. त्याला रिषभ पंत जबरदस्त साथ देत आहे.

सरफराज खान यानं शतक झळकावल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं एक्सवर पोस्ट केली आहे. सरफराज खान, जेव्हा भारताला सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तू पहिलं शतक झळकावलंस, असं सचिन म्हणाला.

Sarfaraz Khan Century Latest News
WTC Points Table: ...तर टीम इंडियाचं होणार मोठं नुकसान; पाकिस्तानच्या विजयामुळे WTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल

रचिन रविंद्रचंही कौतुक

सचिन तेंडुलकर यानं सरफराज खान याचं कौतुक केलंच, पण न्यूझीलंडचा शतकवीर रचिन रविंद्र याच्या पाठीवरही कौतुकाची थाप दिली. रचिनच्या शतकाच्या जोरावरच न्यूझीलंड ४०२ धावा करू शकला. तसेच पाहुण्या संघाला भारतावर ३५६ धावांची मोठी आघाडी मिळवता आली.

रचिन रविंद्रचं बेंगळुरूशी खास नातं आहे. त्याचं कुटुंबच तिथलं आहे. तिथेच त्याच्या नावावर आणखी एक शतक, अशी प्रतिक्रिया सचिननं दिली आहे. या दोघा प्रतिभावान युवकांसाठी येणारा काळ खूपच रोमांचक आहे, असंही सचिन म्हणाला.

बेंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारताचा अवघ्या ४६ धावांवर खुर्दा झाला. कसोटी मालिकेची सुरुवातच भारतासाठी वाईट झाली होती. मात्र, दुसऱ्या डावात भारतानं जबरदस्त कमबॅक केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com