Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! IND vs NZ मालिका संपताच स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
team indiayandex

Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! IND vs NZ मालिका संपताच स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Wriddhiman Saha Retirement: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका झाल्यानंतर स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Published on

गेली अनेक वर्ष भारतीय कसोटी संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रिद्धीमान साहाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असणारा रिद्धीमान साहा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतोय.

रणजी ट्रॉफी सुरु असतानाच त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. ही स्पर्धा त्याच्या प्रोफेशनल क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

एमएस धोनीनंतर रिद्धीमान साहा हा भारतीय संघातील प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज होता. मात्र रिषभ पंत आल्यानंतर त्याला आपलं स्थान गमवावं लागलं. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पराभूत केलं होतं. या मालिकेदरम्यान रिद्धीमान साहा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होता.

Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! IND vs NZ मालिका संपताच स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
IND vs NZ: टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी कुठं? मास्टर ब्लास्टरने सांगितलं कारण

काय म्हणाला रिद्धीमान साहा?

रिद्धीमान साहाने पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की,' क्रिकेटमधील शानदार प्रवासानंतर, आगामी हंगाम हे माझ्या कारकिर्दीतील शेवटचं हंगाम असणार आहे. बंगाल संघाचं प्रतिनिधित्व करताना, मला अभिमान वाटतोय. निवृत्त होण्यापूर्वी मी शेवटची रणजी ट्रॉफी खेळणार. या प्रवासात मला साथ दिल्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार.'

रिद्धीमान साहा २०२१ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरली. रिद्धीमान साहा हा भारतीय संघासाठी सर्वाधिक शतकं झळकावणारा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज आहे. तर एमएस धोनी आणि रिषभ पंत अव्वल स्थानी आहे.'

Team India News: टीम इंडियाला मोठा धक्का! IND vs NZ मालिका संपताच स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा
IND vs NZ Test: 'आज तुम्हाला द्रविडची आठवण..' भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडू भडकला

अशी राहिलीये कारकिर्द

साहाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला भारतीय संघासाठी ४० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २९.४१ च्या सरासरीने १३५३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये ३ शतक आणि ६ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे. तर ९ वनडे सामन्यांमध्ये त्याला ४१ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com