आयपीएल २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता मेगा ऑक्शनबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की, आयपीएलचं ऑक्शन केव्हा सुरू होणार? आता या ऑक्शन ठिकाण आणि तारीख ठरली आहे. हे ऑक्शन येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी जेद्दामध्ये होणार आहे.
या ऑक्शनसाठी एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. ज्यात ४०९ परदेशी आणि ११६५ भारतीय खेळाडूंचा समावेश असणार आहे. खेळाडूंची संख्या १५०० च्या पार असली तरीदेखील सर्व १० संघांना केवळ २०४ खेळाडू संघात घेता येणार आहेत. तर एका संघात जास्तीत जास्त २५ खेळाडूंना स्थान दिले जाऊ शकते.
ऑक्शनबद्दल संपूर्ण माहिती
कॅप्ड भारतीय खेळाडू - ४८
कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू - २७२
अन्कॅप्ड भारतीय ( गेल्या हंगामात आयपीएल खेळणारे) - १५२
अन्कॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू ( गेल्या हंगामात आयपीएल खेळणारे) - ३
अन्कॅप्ड भारतीय - ९६५
अन्कॅप्ड आंतरराष्ट्रीय - १०४
कोणत्या देशातील किती खेळाडूंनी नोंदवलं नाव?
अफगाणिस्तान -२९
ऑस्ट्रेलिया -७६
बांगलादेश -१३
कॅनडा- ४
इंग्लंड -५२
आयर्लंड-९
इटली- १
नेदरलँड -१२
न्यूझीलंड- ३९
स्कॉटलंड -२
दक्षिण आफ्रिका - ९१
श्रीलंका-२९
यूएई-१
यूएसए -१०
वेस्टइंडीज -३३
झिम्बाब्वे - ८
सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
मुंबई इंडियन्स - हार्दिक पंड्या (१६.३५ कोटी), रोहित शर्मा (१६.३० कोटी), सूर्यकुमार यादव (१६.३५ कोटी),तिलक वर्मा (८ कोटी), जसप्रीत बुमराह (१८ कोटी),
चेन्नई सुपर किंग्ज - ऋतुराज गायकवाड (१८ कोटी), मथीशा पथिराना (१३ कोटी), एमएस धोनी (४ कोटी),शिवम दुबे (१२ कोटी), रविंद्र जडेजा (१८ कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स - रिंकू सिंह (१३ कोटी), वरुण चक्रवर्ती (१२ कोटी), सुनील नरेन (१२ कोटी), आंद्रे रसेल (१२ कोटी), रमनदीप सिंह (४ कोटी), हर्षित राणा (४ कोटी),
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
विराट कोहली (२१ कोटी), यश दयाल (५ कोटी) रजत पाटीदार (११ कोटी)
दिल्ली कॅपिटल्स - कुलदीप यादव (१३.२५ कोटी), अक्षर पटेल (१६.५० कोटी), ट्रिस्टन स्टब्ज (१० कोटी), अभिषेक पोरेल (४ कोटी)
लखनऊ सुपर जायंट्स - निकोलस पुरन (२१ कोटी), रवी बिश्नोई (११ कोटी), मयांक यादव (११ कोटी), मोहसिन खान (४ कोटी), आयुष बदोनी (४ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद - पॅट कमिन्स (१८ कोटी), अभिषेक शर्मा (१४ कोटी), नितीश कुमार (६ कोटी), हेनरिक क्लासेन (२३ कोटी), ट्रेविस हेड (१४ कोटी)
राजस्थान रॉयल्स - संजू सॅमसन (१८ कोटी), यशस्वी जयस्वाल (१८ कोटी), रियान पराग (१४ कोटी), शिमरन हेटमायर (११ कोटी), ध्रुव जुरेल (१४ कोटी), संदीप शर्मा (४ कोटी)
पंजाब किंग्ज - शशांक सिंह (५.५ कोटी), प्रभासिमरन सिंह (४ कोटी)
गुजरात टायटन्स- शुभमन गिल, राशिद खान, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.