GT VS DC Ishant Sharma X
Sports

Ishant Sharma : चेहरा सुकलेला, डोक्यावर भिजलेला टॉवेल.. इशांत शर्माला उन्हाचा त्रास सहन होईना; सामन्यातील 'हा' फोटो व्हायरल

GT VS DC Ishant Sharma : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यादरम्यान गुजरातचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा उष्णता आणि गरम वातावरणामुळे हैराण झाल्याचे पाहायला मिळाले.

Yash Shirke

नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना रंगला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने २० ओव्हर्समध्ये २०३ धावा केल्या. आता गुजरातच्या खेळाडूंना सामना जिंकण्यासाठी २०४ धावा कराव्या लागणार आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंना मैदानात उन्हाचा, उष्ण वातावरणाचा त्रास होत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे ४० डिग्री सेल्सियसच्या आसपास तापमान आहे. याचा परिणाम दिल्ली आणि गुजरात या दोन्ही संघातील खेळाडूंवर झाला आहे. गरम हवामानामुळेच शुभमन गिलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान उष्णतेचा त्रास झाल्याने गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हैराण झाला.

पहिल्या इनिंगमध्ये इशांत शर्माने २ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करताना १४ धावा दिल्या. १४ व्या ओव्हरच्या दरम्यान इशांत शर्मा उन्हामुळे त्रासाने थकून गेला होता. त्रास सहन न झाल्याने त्याने मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. इशांत शर्मा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन बसला. गुजरातच्या सपोर्ट स्टाफने त्याला पाणी वगैरे दिले. त्याच्या डोक्यावर ओला टॉवेट ठेवला. काही वेळ आराम केल्यानंतर इशांत शर्मा मैदानात फलंदाजीसाठी उतरला.

एकोणविसाव्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा इशांत शर्मा फलंदाजीसाठी आला, त्यावेळेस दिल्लीचा आशुतोष शर्मा फलंदाजी करत होता. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरुन इशांत शर्मा आणि आशुतोष शर्मा यांच्यामध्ये काही वेळेसाठी वाद झाला. उन्हामुळे वैतागलेला इशांत शर्मा युवा आशुतोषवर भडकल्याचे पाहायला मिळाले. त्या वेळचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अरशद खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाची आढावा बैठक सुरू

Nanded Rain : गोदावरी, असना नदीच्या पुराचे पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा झाला चिखल

Pune Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

SCROLL FOR NEXT