Manasvi Choudhary
आजकाल महिला साडीवर स्टायलिश लूकसाठी मेसी बन हेअरस्टाईल करतात. हा एक मॉडर्न लूक दिसतो.
जर तुम्ही डिझायनर किंवा काठपदर साडी नेसली असेल तर तुम्ही मेसी बन बांधू शकता. मेसी बन हेअरस्टाईल अत्यंत सोपी आहे.
मेसी बन बांधण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही केस नीट विंचरून घ्या नंतर केसांच्या मध्ये छोटा भांग करून एका साईडला आर्धी केस घ्या.
नंतर सर्व केस एकत्र करून खाली सैल पोनी घाला. मेसी बनसाठी केस खूप घट्ट बांधू नका.
नंतर पोनी बांधलेल्या केसांचे तीन भाग करा आणि हलकासा पिळून रबर रबर बँडच्या भोवती गुंडाळा. गुंडाळताना ते खूप नीटनेटके नसावे; थोडे केस बाहेर निघाले तरी चालतील, कारण तोच 'मेसी' लूक आहे.
गुंडाळलेले केसांचे टोक बॉबी पिन्स किंवा यु-पिन्सच्या साहाय्याने अंबाड्यामध्ये व्यवस्थित खोचून द्या. अंबाडा घट्ट बसला आहे याची खात्री करा, पण तो दिसायला सैल असावा.
मेसी बनच्या एका बाजूला एक मोठे गुलाबाचे फूल किंवा छोटी मोगऱ्याची बट लावा. साडीवर हा लूक अतिशय रॉयल दिसतो.