Manasvi Choudhary
महिला केसांची अंबाडा स्टाईल करतात कोणत्याही स्टाईलवर अंबाडा हा उठून दिसतो.
अंबाडा बांधणे अनेकांना जमत नाही यासाठी आज आम्ही तुम्हाला मोठ्या व छोट्या केसांचा अंबाडा कसा बांधायचा हे सांगणार आहोत.
मोठे केस असतील तर अंबाडा छान भरगच्च दिसतो. यासाठी तुम्ही 'ट्विस्ट अँड टर्न' ही केसांची स्टाईल करू शकता.
सर्व केस व्यवस्थित विंचरून घ्या आणि हाय पोनीटेल बांधा. पोनीटेल केसांचे दोन भाग करा आणि ते एकमेकांमध्ये दोरीसारखे गुंफा. नंतर हे केस रबर बँडच्या भोवती गोलाकार गुंडाळा. अंबाडा घट्ट राहण्यासाठी 'U-pins' किंवा 'Bobby pins' लावा.
छोट्या, कमी केसांचा अंबाडा घालण्यासाठी तो सुटण्याची भिती असते यासाठी तुम्ही 'मेसी बन' ही स्टाईल करू शकता.
केस विंचरून मागे घ्या आणि केसांचा खालीच पोनीटेल बांधा. जर केस खूपच छोटे असतील, तर केसांचे छोटे छोटे सेक्शन करून ते ट्विस्ट करून पिन्सने मागे टोचले तरी छान 'मेसी अंबाडा' बनेल.
केसांचा अंबाडा नीट राहावा यासाठी यु-पिन्स लावताना त्या नेहमी अंबाड्याच्या विरुद्ध दिशेने टोचून मग आत सरकवा, यामुळे पकड घट्ट बसते.