Manasvi Choudhary
चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. मात्र महागड्या कोणत्याही क्रिमपेक्षा तुम्ही घरच्या घरी फेस मसाज केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल.
योग्य पद्धतीने मसाज केल्यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते, चेहऱ्यावरील स्नायूंचा ताण कमी होतो आणि त्वचेला आतून चमक मिळते.
मसाज सुरू करण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवा आणि कोरडा करा. चेहऱ्यावर बदाम तेल किंवा खोबरेल तेल लावा.
दोन्ही हातांच्या बोटांनी कपाळाच्या मध्यभागापासून सुरुवात करून बाहेरच्या बाजूला हलका दाब देत मसाज करा.
डोळ्यांच्या खालील भागावर अनामिका बोट वापरून गोलाकार फिरवा. डोळ्यांच्या आतील कोपऱ्यापासून बाहेरच्या कोपऱ्यापर्यंत हलकेच मसाज करा.
हातांच्या बोटांनी खालून वरच्या दिशेने मसाज करा. गालांना थोडे फुगवून 'V' आकारात बोटांनी मसाज केल्यास त्वचा घट्ट राहते.
अंगठा आणि पहिल्या बोटाच्या मदतीने हनुवटीपासून कानापर्यंत मसाज करा. तसेच मानेवर खालून वरच्या दिशेने मसाज करायला विसरू नका.