Manasvi Choudhary
केसांच्या निरोगी आरोग्यासाठी केवळ तेल लावणं महत्वाचं नाही तर केसांना पोषण मिळणं देखील महत्वाचं आहे.
केसांच्या वाढीसाठी लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिड महत्वाचे असते यासाठी तुम्ही एनर्जेटिक ड्रिंक पिणे महत्वाचे आहे.
केसांच्या वाढीसाठी पालकचा ज्यूस महत्वाचा आहे. यामुळे केसांचा पोत सुधारते आणि केस गळती देखील कमी होते.
पालक ज्यूस बनवण्यासाठी पालक, कढीपत्ता, आवळा, काकडी, पुदीना, लिंबाचा रस, आले हे साहित्य एकत्र करा.
सर्वात आधी पालक, कढीपत्ता, काकडी आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्या. आवळ्याच्या बिया काढून त्याचे तुकडे करा.
वरील सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या. तयार झालेला रस गाळणीने गाळून घ्या.
त्यात लिंबाचा रस आणि हवे असल्यास थोडे काळं मीठ घालून मिक्स करा अशाप्रकारे पालक ज्यूस तयार होईल.