Manasvi Choudhary
कोकम आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी 'कोकम सरबत' प्यायले जाते.
कोकममध्ये नैसर्गिकरीत्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात यामुळे कोकम सरबत उन्हाळ्यात पितात.
कोकम सरबत घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही अगदी सहज पद्धतीने घरीच कोकम सरबत बनवू शकता.
कोकम सरबत बनवण्यासाठी कोकम रस, साखर, गूळ, जिरे पावडर, काळे मीठ, बर्फ, पुदीना पाने हे साहित्य एकत्र घ्या.
एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घ्या. त्यात कोकम रस आणि साखर मिक्स करा. हे संपूर्ण मिश्रण चांगले ढवळून घ्या म्हणजे साखर विरघळेल.
नंतर यात जिरा पावडर, काळे मीठ मिक्स करून सरबत तयार करा सर्व साहित्य एकत्र मिक्स करा
एका ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाका आणि त्यावर तयार केलेले कोकम सरबत ओता.
उन्हाळ्यात कोकम सरबत प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास आणि जळजळ कमी होते.