Manasvi Choudhary
काखेतील काळेपणा ही एक सामान्य समस्या आहे. डे स्किन सेल्समुळे ही समस्या दिवसेदिवस अधिक वाढते.
डेड स्किन सेल्स, डिओडोरंट्सचा अतिवापर, वॅक्सिंग किंवा सततच्या घर्षणामुळे काखेतील काळेपणा वाढतो यासाठी तुम्ही घरीच सोप्या टिप्स करू शकता.
बटाट्याचे काप करून ते काखेवर चोळा किंवा बटाट्याचा रस काढून तो कापसाच्या मदतीने लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
बेकिंग सोडामध्ये थोडे पाणी मिसळून ही पेस्ट काखेवर लावून २-३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.
लिंबू डाग घालवण्यास मदत करते, तर साखर स्क्रबचे काम करते. लिंबाच्या अर्ध्या फोडीवर थोडी साखर टाका आणि ती काखेवर गोलाकार फिरवा.
कोरफड जेल काखेवर लावा आणि २० मिनिटानंतर धुवून टाका कोरफड त्वचेला थंडावा देते आणि काळवंडलेली त्वचा दुरुस्त करते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी ५-१० मिनिटे खोबरेल तेलाने काखेमध्ये मसाज करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.