Anaya Bangar: ते न्यूड फोटो मला पाठवायचे, संबंध ठेवायला सांगायचे, भारतीय क्रिकेटपटूंवर अनाया बांगरचे धक्कादायक आरोप

Anaya Bangar News: भारतीय माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या मुलाने, आर्यनने लिंग परिवर्तन केले आहे. त्याने अनाया अशी नवी ओळख स्वीकारली आहे. अनायाच्या एका मुलाखतीची सर्वत्र चर्चा आहे.
Anaya Bangar News
Anaya BangarSaam Tv
Published On

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल २०२५ मध्ये कॉमेंट्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. संजय बांगर यांच्या मुलगा आर्यनने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केली. त्यानंतर आर्यनने अनाया ही नवी ओळख स्वीकारली. काही दिवसांपूर्वीच अनाया बांगर इंग्लंडहून भारतात परतली आहे. अनायाच्या एका मुलाखतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

लल्लनटॉपच्या यूट्यूब चॅनलला अनाया बांगरने भेट दिली. अनायाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक गोष्टींबद्दल खुलासे केले. ती म्हणाली, 'काही क्रिकेटपटूंना माझ्याबद्दल आणि माझ्या ट्रान्स ओळखीबद्दल समजले. त्यातल्या एकाने माझ्याकडे शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. ते मला न्यूड फोटो पाठवत. त्यांना वाटत होते की तसले फोटो (Photo) पाठवल्यानंतर काहीतरी होईल.'

न्यूड फोटोनंतर तू काही केलं नाहीस का? असा प्रश्न अनायाला विचारण्यात आला. मला कुणी वाईट नजरे्ने पाहावे असे वाटत नव्हते. मी त्यावर काहीही न करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण परिस्थिती टाळली, असे अनाया बांगरने उत्तर दिले. ते लोक माझे मित्र नव्हते, ते म्हणायचे, चल कारमध्ये बस. त्यांना माझ्यासोबत संबंध ठेवायचे होते. ते लोक मला सगळ्यासमोर शिव्या घालायचे आणि नंतर माझ्याकडे फोटो मागायचे, असे वक्तव्य अनायाने केले.

आर्यन बांगर क्रिकेट (Cricket) खेळायचा. रणजीसारख्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये तो मुंबईच्या संघाकडून खेळायचा. 'ज्या वेळेस आर्यनने लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी (संजय बांगर) क्रिकेट खेळणं सोडण्यास सांगितले. क्रिकेटमध्ये तुला स्थान उरलं नाही असे ते म्हणाले अशी माहिती अनाया बांगरने लल्लनटॉपशी संवाद साधताना दिली.

Anaya Bangar News
Anaya Bangar : माझ्या मम्मीची सून बनशील का? लिंग परिवर्तन केलेल्या संजय बांगरच्या लेकाला लग्नाची ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com