IPL 2025 सुरु असताना BCCI ॲक्शन मोडवर, मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे फ्रँचायझी मालकावर घातली बंदी

BCCI News : देशात आयपीएलची धामधुम सुरु आहे. अशातच बीसीसीआयने मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याने एका फ्रेंचायझीच्या मालकावर कारवाई केली आहे. क्रिकेट बोर्डाने या मालकावर बॅन आणला असल्याची माहिती समोर आली आहे.
BCCI News
BCCI NewsX
Published On

Match Fixing : भारतासह जगभरात इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलची चर्चा सुरु आहे. आयपीएल २०२५ मधील आतापर्यंत ३४ सामने खेळले गेले आहेत. दिल्ली, गुजरात, पंजाब असे संघ सध्या टॉपवर आहेत. मुंबई इंडियन्सने सुरुवातीला फ्लोप शो दाखवला. पण त्यांनीही कमबॅक केले आहे. मुंबईसह चेन्नई देखील रंगात येत असल्याचे म्हटले जात आहे. आयपीएलची धामधुम सुरु असताना बीसीसीआयने फिक्सिंग विरोधात केलेल्या एका कारवाईची मोठी चर्चा होत आहे.

मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मुंबई टी-२० लीगमधील संघाचे माजी सह-मालक गुरमीत सिंग भामराह यांच्यावर बंदी घातली आहे. मुंबई-टी २० लीगच्या २०१९ मधील दुसऱ्या सीझनमध्ये मॅच फिक्सिंगसाठी धवल कुलकर्णी आणि भाविन ठक्कर यांच्याशी संपर्क साधल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बीसीसीआयचे लोकपाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी गुरमीत सिंग यांच्यावर बंदी घातल्याची माहिती समोर आली आहे.

BCCI News
Anaya Bangar: ते न्यूड फोटो मला पाठवायचे, संबंध ठेवायला सांगायचे, भारतीय क्रिकेटपटूंवर अनाया बांगरचे धक्कादायक आरोप

गुरमीत सिंग भामराह जीटी-२० कॅनडा लीगमध्येही सक्रीय होते. ही लीग आता बंद झाली आहे. मुंबई टी-२० लीगमध्ये आधी त्यांचा सहभाग होता. सोबो सुपरसॉनिक्स या संघाचे ते सह-मालक होते. बीसीसीआयने त्यांच्यावर किती वर्षांची बंदी घातली हे अद्यापही अस्पष्ट आहे. तरीही बीसीसीआयच्या भष्ट्राचार विरोधी संहितेनुसार, भामराह यांच्यावर ५ वर्ष ते आजीवन बंदी घातली जाऊ शकते.

BCCI News
IPL 2025 : संजू सॅमसन आणि राहुल द्रविड यांच्यात वाद? व्हायरल व्हिडीओचं सत्य अखेर समोर...

मुंबई टी-२० लीग २०१८ मध्ये खेळली गेली होती. २०१९ मध्ये त्याचा दुसरा सीझन आला होता. करोना महामारीमुळे मुंबई टी-२० लीगचे आयोजन करणे शक्य झाले नाही. तब्बल चार वर्षांनी म्हणजे २०२५ मध्ये या लीगचा तिसरा सीझन खेळला जाणार आहे. आयपीएलनंतर लगेच ही लीग सुरु होईल. रोहित शर्मा हा मुंबई टी-२० लीगचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

BCCI News
Anaya Bangar : माझ्या मम्मीची सून बनशील का? लिंग परिवर्तन केलेल्या संजय बांगरच्या लेकाला लग्नाची ऑफर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com