ireland twitter
क्रीडा

SA vs IRE: अफगाणिस्ताननंतर दक्षिण आफ्रिकेला आयर्लंडचा दणका! मिळवला ऐतिहासिक विजय

Ankush Dhavre

Ireland Beat South Africa: दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार रंगला. या मालिकेत अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला २-१ ने धूळ चारली. अफगाणिस्तानकडून पराभव झाल्यानंतर आता आयर्लंडनेही दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला आहे. २ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा विजय आयर्लंड संघासाठी ऐतिहासिक ठरला आहे. कारण हा आयर्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळवलेला पहिलाच विजय आहे.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने दमदार कमबॅक केलं . या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

या सामन्यात आयर्लंडला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या संघाने २० षटकअखेर ६ गडी बाद १९५ धावा केल्या. या सामन्यात डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या रॉस अडायरने ५८ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १०० धावांची खेळी केली. तर पॉल स्टर्लिंगने देखील तुफान फटकेबाजी केली. त्याने ३१ चेंडूंचा सामना करत ५२ धावा चोपल्या.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १९६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून हेंड्रिक्सने ३२ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५१ धावांची खेळी केली. तर ब्रीत्जकेनेही ५१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला २० षटक अखेर ९ गडी बाद १८५ धावा करता आल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला हा सामना १० धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar: सईचे फोटो पाहून काळजाचं झालं पाणी पाणी

Health Tip: रात्री झोपताना पाणी पिण्याचे फायदे!

Maharashtra News Live Updates : पुण्यातील खडकवासला धरणावर कपडे धुण्यासाठी गर्दी

Shweta Tiwari Photo : सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा! श्वेताचे फोटो पाहून फिदा

Papaya Eating Benefits : पपयी खा आणि निरोगी राहा; वाचा चकित करणारे फायदे

SCROLL FOR NEXT