IND vs BAN 2nd Test, Day 4: चौथ्या दिवशीही पावसाची बॅटिंग? कानपूरमधून समोर आली मोठी अपडेट

India vs Bangladesh 2nd Test Day 4 Weather Update: भारत आणि बांगलादेश यांच्यातील चौथ्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.
IND vs BAN 2nd Test, Day 4: चौथ्या दिवशीही पावसाची बॅटिंग? कानपूरमधून समोर आली मोठी अपडेट
kanpur cricket groundtwitter
Published On

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. कानपूरच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात आतापर्यंत केवळ ३५ षटकांचा खेळ होऊ शकला आहे. तर पुढील २ दिवसांचा खेळ हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस होता. तर तिसऱ्या दिवशी पाऊस थांबला, मात्र मैदान ओलं असल्याने खेळ होऊ शकला नाही. दरम्यान सामन्याच्या चौथ्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.

कानपूरमधून क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. , AccuWeather च्या अंदाजानुसार, सामन्यातील चौथ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही केवळ २० टक्के इतकीच असणार आहे. तर सामन्याच्या पाचव्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज हा केवळ १० टक्के आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २ दिवस ॲक्शनपॅक क्रिकेट पाहायला मिळू शकते.

IND vs BAN 2nd Test, Day 4: चौथ्या दिवशीही पावसाची बॅटिंग? कानपूरमधून समोर आली मोठी अपडेट
IND vs BAN 2nd Test: कानपूर कसोटीचा तिसरा दिवसही पाण्यात! क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले. आकाश दीपने जाकीर हसनला शून्यावर तर इस्लामला २४ धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर कर्णधार शांतोने ३१ धावांची खेळी केली. बांगलादेशकडून मोमिनुल हक ४० आणि रहीम ६ धावांवर नाबाद आहे. बांगलादेशने ३५ षटकअखेर ३ गडी बाद १०७ धावा केल्या आहेत.

IND vs BAN 2nd Test, Day 4: चौथ्या दिवशीही पावसाची बॅटिंग? कानपूरमधून समोर आली मोठी अपडेट
IND vs BAN: 3 वर्ष संघाबाहेर असलेल्या गोलंदाजाला टीम इंडियात संधी! गंभीर सोबत आहे खास कनेक्शन

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com