IND vs BAN: 3 वर्ष संघाबाहेर असलेल्या गोलंदाजाला टीम इंडियात संधी! गंभीर सोबत आहे खास कनेक्शन

Varun Chakaravarthy: भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
IND vs BAN: 3 वर्ष संघाबाहेर असलेल्या गोलंदाजाला टीम इंडियात संधी! गंभीर सोबत आहे खास कनेक्शन
team indiayandex
Published On

Team India Squad, IND vs BAN T20I Series: भारत आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर, दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला टी -२० सामना ६ ऑक्टोबर तर मालिकेतील दुसरा सामना ९ आणि तिसरा सामना १२ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या संघात एका गोलंदाजाला ३ वर्षांनंतर संधी मिळाली आहे.

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. वरुण चक्रवर्तीला २०२१ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याला संघात संधी मिळाली नव्हती. आता गंभीर हेड कोच बनताच त्याला कमबॅक करण्याची संधी देण्यात आली आहे.

यूएईमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपसाठी वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी तो आपला शेवटचा टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला.

त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ षटकात ३३ धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ षटकात २३ धावा खर्च केल्या होत्या. या कामगिरीनंतर त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

IND vs BAN: 3 वर्ष संघाबाहेर असलेल्या गोलंदाजाला टीम इंडियात संधी! गंभीर सोबत आहे खास कनेक्शन
IND vs BAN: सूर्याच्या नेतृत्वाखाली या खेळाडूंना मिळू शकते संधी! टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ

मिस्ट्री गोलंदाज म्हणून प्रसिद्ध

वरुण चक्रवर्ती हा मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखला जातो. तो लेगब्रेक, ऑफब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन आणि यॉर्कर इतक्या प्रकारचे चेंडू टाकू शकतो. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याला आतापर्यंत ६ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याला केवळ २ गडी बाद करता आले आहेत. आयपीएल स्पर्धेत त्याने ७० सामन्यांमध्ये ८३ गडी बाद केले आहेत.

IND vs BAN: 3 वर्ष संघाबाहेर असलेल्या गोलंदाजाला टीम इंडियात संधी! गंभीर सोबत आहे खास कनेक्शन
India vs Bangladesh T20I Series: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमारकडे कर्णधारपदाची जबाबदारी, संघात कोणाला मिळाली संधी? वाचा

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com