नवी दिल्ली : आयसीसी वुमेन्स टी२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात ३ ऑक्टोबर रोजी होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व देशातील संघ दुबईत पोहोचले आहेत. या स्पर्धेचं यजमान पद बांगलादेशकडे होते. मात्र, तेथील परिस्थिती बिघडल्यानंतर शेजारी देशात या स्पर्धेचं आयोजन करण्याचं ठरवण्यात आलं. त्यामुळे आयसीसीने टी२० विश्वचषक स्पर्धेचं आयोजन दुबईत करण्याचं ठरवलं आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघ देखील दुबईत पोहोचला आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची उत्सुकता सर्वांन लागली आहे.
वुमेन्स टी२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघामध्ये ६ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी ३.३० वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्याच्या तिकीटाचे दर देखील जाहीर करण्यात आले आहेत.
तुम्हालाही भारत विरुद्ध पाकिस्तानमधील सामना स्टेडियमध्ये बसून पाहायचा असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन सामन्याचं तिकीट बुक करू शकता. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यानंतर त्याच मैदानात सायंकाळी वेस्टइंडिज आणि स्कॉटलँडदरम्यान सामना होणार आहे. दोन्ही सामन्यासाठी एकच तिकीट मिळणार आहे. या सामन्याचं तिकीट १५ दिहरम म्हणजे ३४२ रुपये ठेवण्यात आलं आहे.
मैदानातील वेगवेगळ्या स्टँडनुसार तिकीटांचे दर ठेवण्यात आले आहेत. तर काही तिकीट २५ दिहरम म्हणजे ५७० रुपये देखील आहे. दरम्यान, हे सामने पाहण्यासाठी १८ वर्षांखालील वयोगटातील तरुणांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. त्यांना मोफत सामना पाहण्याची संधी आहे.
महिला टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत यंदा १० संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. हे १० संघ दोन गटात विभागले आहेत. दोन्ही गटात प्रत्येकी ५-५ संघ असणार आहेत. ए ग्रुपमध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.