India vs Bangladesh T20I Series: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या संघात काही असे खेळाडू आहेत ज्यांना संधी देण्यात आलेली नाही. काय आहेत यामागची करणं? जाणून घ्या.
बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर संघातील काही प्रमुख खेळाडू आहेत, ज्यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. ज्यात रिषभ पंत, युजवेंद्र चहल आणि शुभमन गिल यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
शुभमन गिल आणि रिषभ पंत हे दोघेही बांगलादेशविरुद्ध सुरू असलेली कसोटी मलिका खेळण्यात व्यस्त आहेत. ही मालिका झाल्यानंतर टी -२० मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे वर्कलोड मॅनेज करण्यासाठी या दोघांनाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रिषभ पंतचा कार अपघात झाल्यानंतर तो काही महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर त्याला काही महिने क्रिकेटपासून दूर राहावं लागलं होतं. अखेर आयपीएल २०२४ स्पर्धेतून त्याने कमबॅक केलं. त्यानंतर त्याला भारतीय संघातही खेळण्याची संधी मिळाली. तर गिलला यावर्षी भारतीय टी -२० संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
युजवेंद्र चहलला भारतीय संघात संधी न मिळणं ही सर्वांना आश्चर्यचकित करणारी बाब आहे. त्याला टी -२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळालं होतं. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर काउंटी क्रिकेटमध्येही त्याच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. तरीदेखील त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.