Rishabh Pant : भाई, हेल्मेटमधून पण LBW...; विकेटच्या मागून ऋषभ पंतने केली कमेंट, पाहा Video

Rishabh Pant Mic Recording goes viral :स्टम्पच्या मागे उभे राहून फलंदाजांसोबत माईंड गेम कसं खेळायचं हे पंतला बरोबर माहितीये. ऋषभ पंतचा पुन्हा एकदा वेगळा अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला.
Rishabh Pant Mic Recording goes viral
Rishabh Pant Mic Recording goes viral saam tv
Published On

सध्या बांगलादेश विरूद्ध भारत यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येतोय. दरम्यान या सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला. दरम्यान या सामन्यामध्ये भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतचा पुन्हा एकदा वेगळा अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला.

स्टम्पच्या मागे उभे राहून फलंदाजांसोबत माईंड गेम कसं खेळायचं हे पंतला बरोबर माहितीये. भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात असंच काहीसं पहायला मिळालं. या सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ रन्सचा खेळ झाला. मात्र यामध्ये देखील ऋषभ पंतने बांगलादेशी फलंदाजांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही.

Rishabh Pant Mic Recording goes viral
IND vs BAN 2nd Test: कानपूर कसोटीत पावसाची जोरदार बॅटिंग! पहिल्या दिवसाचा खेळ ३५ षटकातच संपला; पाहा Scorecard

कधी घडली ही घटना?

ही घटना बांगलादेशी डावाच्या ३३ व्या ओव्हरमध्ये घडली. यावेळी मुश्फिकुर रहीम नॉन स्टायकर एंडवर उभा होता. या ओव्हरमध्ये टीम इंडियाकडून रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करत होता. यावेळी पंतने म्हटलं, इधर से LBW ले सकते हैं हेल्मेट से. हेल्मेट से एक LBW ले सकते हैं भाई.

ऋषभ पंतची विरूद्ध टीमच्या फलंदाजांना त्रास देण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. यावेळी इंग्रजी कमेंट्री करणारे भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांना देखील हसू आवरलं नाही. यावेळी पंतने कमेंट केली कारण, त्याच ओव्हरमध्ये मोमिनुल हक स्वीप खेळण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी बॉल त्याच्या हेल्मेटवर आदळला होता.

पहिल्या दिवशी केवळ ३५ ओव्हर्सचा खेळ

भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे एक तास उशीरा सुरु करण्यात आला. यावेळी सतत पाऊस येत असल्याने पहिल्या दिवसाचा खेळ दुपारी ३ वाजताच्या आसपास घोषित करण्यात आला. मात्र त्यापूर्वी बांगलादेशाने ३५ ओव्हर्समध्ये १०७ रन्स केले होते. याशिवाय बांगलादेशाने ३ विकेट्सही गमावले होते.

Rishabh Pant Mic Recording goes viral
IND vs BAN 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान?

दुसऱ्या दिवशीची पावसाचा खेळ

या सामन्यात पहिल्या दिवशी पाऊस आल्याने एकूण ६५ ओव्हर्स कमी फेकण्यात आले. दरम्यान आता दुसऱ्या दिवसाचा खेळही उशीरा सुरु होणार आहे. हवामान खात्याच्या बेवसाईटच्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशीची ८० टक्के पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com