भारतीय संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहल हा भारताचा टी -२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. मात्र तरीदेखील त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. काही महिन्यांपूर्वी झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत त्याला स्थान मिळालं होतं, मात्र प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं नव्हतं. दरम्यान संधी मिळत नसताना त्याने परदेशात खेळताना खास शतक पूर्ण केलं आहे.
भारतीय संघात स्थान मिळत नसलेला चहल सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेली काउंटी क्रिकेट स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेत खेळताना तो नॉर्थर्हॅम्पटनशायर संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाकडून खेळताना त्यानं शानदार कामगिरी करून दाखवली आहे. या स्पर्धेत डर्बिशायर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ९ गडी बाद केले.
यासह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ५ फलंदाजांना माघारी धाडलं, तर दुसऱ्या डावात त्याने ४ फलंदाज बाद केले. हे ९ गडी बाद करण्यासह त्याने कसोटी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० गडी बाद केले आहेत.
युजवेंद्र चहलला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. मात्र तरीदेखील त्याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याने काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. तो २०२३ मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. वेस्टइंडीजविरुद्ध झालेला सामना हा चहलसाठी शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही.
युझवेंद्र चहलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघासाठी ७२ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २७.१३ च्या सरासरीने १२१ गडी बाद केले आहेत. तर टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ८० टी-२० सामन्यांमध्ये त्याने ९६ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.