Yuzvendra Chahal: हात-पाय कलम करा आणि गुप्तांगावर...; कोलकाता अत्याचार प्ररकरणावरून चहल संतापला, पोस्ट व्हायरल होताच केली डिलीट

Yuzvendra Chahal on Kolkata Rape Murder Case: टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलने नुकतंच त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून कोलकाता बलात्कार प्रकरणी एक पोस्ट केली होती. मात्र काही वेळाने त्याने ही पोस्ट डिलिट केली.
Yuzvendra Chahal on Kolkata Rape Murder Case
Yuzvendra Chahal on Kolkata Rape Murder CaseSaam tv
Published On

कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणाने संपूर्ण देश पेटला असून प्रत्येक स्तरावरून न्याय मिळण्याची मागणी केली जातेय. अशातच टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) देखील त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्या नराधमांचे हात-पाय तोडले पाहिजेत, अशा आशयाची पोस्ट चहलने शेअर केली होती. मात्र काही वेळानंतर त्याने ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवल्याचं पहायला मिळालं. (Yuzvendra Chahal on Kolkata Rape Murder Case)

युझवेंद्र चहलने डिलिट केली पोस्ट

दरम्यान पोस्ट करताच काही वेळानंतर चहलने मात्र ही पोस्ट डिलिट केली. मात्र लोकांनी त्याने इन्स्टाग्रामवर ठेवलेल्या या स्टोरीचा स्क्रिनशॉट घेत सोशल मिडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली.

आपल्या स्टोरीच्या माध्यमातून युझवेंद्र चहल म्हणाला होता की, मरपर्यंत फाशी द्यायची? नाही...तर ९० डिग्रीच्या एंगलने त्याचे पाय तोडायचे, त्यानंतर त्यांच्या कॉलबोनला दुखापत पोहोचवायची. इतकंच नाही तर त्याच्या गुप्तांगावर देखील वार करायचे. यानंतर आरोपीला तितका वेळ जिवंत ठेवायचं जोपर्यंत तो वेदना सहन करेल. आणि त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा द्यायची.

Yuzvendra Chahal on Kolkata Rape Murder Case
Afghanistan Coach: टीम इंडियाचा दिग्गज कोच अफगाणिस्तानला प्रशिक्षण देणार! या दौऱ्यासाठी झाली निवड

कोलकाता बलात्कार प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट करणारा युझवेंद्र चहल पहिला खेळाडू नाही. यापूर्वी सौरव गांगुली, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी देखील कोलकाता बलात्कार-मर्डर प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.

नॉर्थेम्पटनशायरकडून युझवेंद्रची कमाल कामगिरी

सध्या टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज वनडे कप २०२४ मध्ये नॉर्थेम्पटनशायरकडून खेळतोय. मात्र त्याच्या टीमला उत्तम कामगिरी करता न आल्याने टूर्नामेंटमधून बाहेरचा रस्ता मिळाला आहे. चहलने या टूर्नामेंटमध्ये एक सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याने ५ विकेट्स घेतले. चहल आथा काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हीजन २ मध्ये नॉर्थेम्पटनशायरकडून खेळताना दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com