Afghanistan Coach: टीम इंडियाचा दिग्गज कोच अफगाणिस्तानला प्रशिक्षण देणार! या दौऱ्यासाठी झाली निवड

R Sridhar Appointed As Aghanistan Assistant Coach: भारतीय संघाजे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर क्षीधर यांची अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
Afghanistan Coach: टीम इंडियाचा दिग्गज कोच अफगाणिस्तानला प्रशिक्षण देणार!
team indiayandex
Published On

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. जो संघ पात्रता फेरीतून बाहेर पडायचा. त्या संघाने टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

या दमदार कामगिरीत प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा राहिला आहे. दिग्गज खेळाडूंनी दिलेल्या प्रशिक्षणाचा अफगाणिस्तानला मोठा फायदा झाला आहे. दरम्यान यात आणखी एका दिग्गज प्रशिक्षकाची भर पडणार आहे. भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर (R Sridhar) यांची अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.

आर श्रीधर हे गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघातील खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचा स्तर खूप उंचावला होता. भारतीय संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना शानदार कामगिरी करुन दाखवली.

यासह त्यांनी आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाचीही भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे त्यांना क्षेत्ररक्षणासह गोलंदाजीतही प्रशिक्षण देण्याचा चांगलाच अनुभव आहे.

Afghanistan Coach: टीम इंडियाचा दिग्गज कोच अफगाणिस्तानला प्रशिक्षण देणार!
Team India News: टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार खेळाडूचं कमबॅक होणं कठीण; जय शहांनी दिली मोठी अपडेट

सहाय्यक प्रशिक्षक म्हणून निवड

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमात्र कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना भारतात खेळवला जाणार आहे. ही मालिका झाल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी आर श्रीधर हे अफगाणिस्तान संघाचे सहाय्यक प्रशिक्षक असणार आहेत.

Afghanistan Coach: टीम इंडियाचा दिग्गज कोच अफगाणिस्तानला प्रशिक्षण देणार!
Team India News: या २ दिग्गज भारतीयांची कारकिर्द जवळजवळ संपली! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही

येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध २ हात करताना दिसून येणार आहे. ही मालिका होण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध एकमात्र कसोटी सामना खेळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com