Team India News: या २ दिग्गज भारतीयांची कारकिर्द जवळजवळ संपली! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही

Cheteshwar Pujara,Ajinkya Rahane: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेसाठी ४ संघांची घोषणा कऱण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
Team India News: या २ दिग्गज भारतीयांची कारकिर्द जवळजवळ संपली! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही
cheteshwar pujara with ajinkya rahaneyandex
Published On

Squad For Duleep Trophy 2024: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेनंतर भारतीय संघातील खेळाडू सध्या विश्रांतीवर आहेत. ब्रेकवर असताना काही खेळाडू बुची बाबू स्पर्धा, तर काही खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळताना दिसून येणार आहेत.

या दोन्ही स्पर्धा युवा खेळाडूंसाठी अतिशय महत्वाच्या असणार आहेत. या दोन्ही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून युवा खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळवण्याची संधी असणार आहे.

या दोन्ही स्पर्धांसाठी भारतीय संघातील अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यांच्या जागी युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे. यावरून स्पष्ट आहे की, निवडकर्त्यांना हे दोघेही अनुभवी खेळाडू संघात नको आहेत.

त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचे कमबॅक करण्याचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत.

Team India News: या २ दिग्गज भारतीयांची कारकिर्द जवळजवळ संपली! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही
IND vs BAN: गंभीर-रोहितला डोकेदुखी! केएल राहुल, श्रेयस अय्यर अन् रिषभ पंत यांच्यामुळे या तिघांचा पत्ता कट?

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी आपला शेवटचा सामना २०२३ मध्ये खेळला होता. पुजारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपला शेवटचा सामना खेळायला उतरला होता.

तर दुसरीकडे अजिंक्य रहाणे २०२३ मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळायला उतरला होता. त्यानंतर हे दोघेही भारतीय संघात कमबॅक करु शकलेले नाहीत. यावरुन असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, या दोघांची कसोटी कारकिर्द संपली आहे.

Team India News: या २ दिग्गज भारतीयांची कारकिर्द जवळजवळ संपली! आता निवृत्तीशिवाय पर्याय नाही
Team India Bowling Coach: ठरलं! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू बनला टीम इंडियाचा बॉलिंग कोच

असे आहेत दोन्ही संघ:

संघ A: शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.

संघ B: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित आवस्थी, एन जगदीशन (विकेटकीपर).

संघ C: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सूथर, उमरान मलिक, वैषाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल (विकेटकीपर), संदीप वॉरियर.

संघ D: श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व ताइडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, ईशान किशन (विकेटकीपर), रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकर, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (विकेटकीपर), सौरभ कुमार.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com