Ajinkya Rahane Catch: धोनी शेर..तर रहाणे सव्वा शेर! धावत आला अन् हनुमान उडी मारत घेतला भन्नाट झेल- Video

CSK vs GT, IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने भन्नाट झेल टिपला होता. आता गुजरातविरुद्धच्या सामन्यातही त्याने शानदार झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ajinkya rahane took stunning diving catch to dismiss david milller in csk vs gt match video viral amd2000
ajinkya rahane took stunning diving catch to dismiss david milller in csk vs gt match video viral amd2000twitter
Published On

Ajinkya Rahane Catch, IPL 2024:

चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. ज्या खेळाडूंना वरिष्ठ म्हणून हिणवलं जातं त्याच खेळाडूंना या संघात स्थान दिलं जातं. या संघातील वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेने गेल्या हंगामात शानदार कामगिरी केली होती.

या हंगामात फलंदाजीत त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र क्षेत्ररक्षणात तो कमाल कामगिरी करताना दिसतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने भन्नाट झेल टिपला होता. आता गुजरातविरुद्धच्या सामन्यातही त्याने शानदार झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Ajinkya Rahane)

रहाणेला टिपला भन्नाट झेल...

या सामन्यात गुजरातला विजयासाठी २०७ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनने शानदार फलंदाजी करत ४१ धावा केल्या होत्या. तो गुजरातला विजयाच्या दिशेने घेऊन जात होता. त्यावेळी १२ वे षटक टाकण्यासाठी तुषार देशपांडे गोलंदाजीला आला. तुषारने अजिंक्य रहाणेला झेलबाद करत माघारी धाडलं.

ajinkya rahane took stunning diving catch to dismiss david milller in csk vs gt match video viral amd2000
CSK vs GT,IPL 2024: दारुण पराभवानंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

तुषारने टाकलेल्या चेंडूवर मिलरने लेग साईडच्या दिशेने शॉट मारला. त्यावेळी मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या अजिंक्य रहाणेने समोरच्या दिशेने डाईव्ह मारली आणि भन्नाट झेल टिपला. या भन्नाट झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Cricket news in marathi)

फलंदाजीत फ्लॉप..

या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने २० षटकअखेर ६ गडी बाद २०६ धावा केल्या. या डावात सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्रने प्रत्येकी ४६-४६ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेला या सामन्यात १२ चेंडूत केवळ १२ धावा करता आल्या. या खेळीदरम्यान त्याला १ चौकार मारता आला.

ajinkya rahane took stunning diving catch to dismiss david milller in csk vs gt match video viral amd2000
IND vs AUS Test Series: IPL सुरु असताना भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर! या मैदानांवर रंगणार सामने

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com