CSK vs GT,IPL 2024: दारुण पराभवानंतर गिल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Shubman Gill Statement: या पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नेमकं काय चुकलं? याबाबत वक्तव्य केलं आहे.
shubman gill statement after csk vs gt ipl match chennai super kings vs gujarat titans
shubman gill statement after csk vs gt ipl match chennai super kings vs gujarat titanstwitter

Shubman Gill Statement, CSK vs GT IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा जलवा सुरुच आहे. या स्पर्धेतील ७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात चेन्नईच्या खेळाडूंनी शानदार खेळ करत गुजरातवर ६३ धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नेमकं काय चुकलं? याबाबत वक्तव्य केलं आहे.

पराभवानंतर काय म्हणाला शुभमन गिल?

चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा एकतर्फी पराभव झाला. ६३ धावांनी झालेल्या पराभवानंतर शुभमन गिलने मान्य केलं की, गुजरातचा संघ फलंदाजीत आणि गोलंदाजीत मागे पडला.

सामन्यानंतर तो म्हणाला की,' त्यांनी शानदार फलंदाजी करत आम्हाला बॅकफुटवर ठेवलं. त्यानंतर गोलंदाजीतही त्याने शानदार कामगिरी केली. आम्ही पावरप्लेच्या षटकांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरलो. आम्हाला १९० ते २०० धावांपर्यंतचं आव्हान मिळू शकतं हे माहित होतं. कारण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. (Cricket news in marathi)

shubman gill statement after csk vs gt ipl match chennai super kings vs gujarat titans
Hardik Pandya Viral Video: दस रुपये का मख्खन.. हार्दिक भाई ढक्कन' गुजरातच्या फॅन्सकडून पंड्या ट्रोल- Video व्हायरल

तसेच नेतृत्वाबाबत बोलताना तो म्हणाला की, 'खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. गुजरात टायटन्ससारख्या संघाचं नेतृत्व करणं शानदार आहे. आम्ही गेल्या हंगामांमध्ये फायनलमध्ये जागा मिळवली आहे. त्यामुळे हे खरंच शानदार आहे.' गुजरात टायटन्स संघाने आयपीएल २०२२ स्पर्धेतून पदार्पण केलं होतं.

shubman gill statement after csk vs gt ipl match chennai super kings vs gujarat titans
IND vs AUS Test Series: IPL सुरु असताना भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर! या मैदानांवर रंगणार सामने

पहिल्याच हंगामात या संघाने जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर पुढील हंगामात या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र फायनलमध्ये चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडल्यानंतर ही जबाबदारी शुभमन गिलवर सोपवण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com