Rohit Sharma Catch: नाद करा पण हिटमॅनचा कुठं! हवेत उडी मारत घेतला एका हाताने कॅच, VIDEO एकदा पाहाच

India vs Bangladesh 2nd Test, Rohit Sharma Catch: भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार कॅच घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Rohit Sharma Catch: नाद करा पण हिटमॅनचा कुठं! हवेत उडी मारत घेतला एका हाताने कॅच, VIDEO एकदा पाहाच
rohit sharmatwitter
Published On

Rohit Sharma Catch News In Marathi: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. कानपूरच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे बांगलादेशकडून फलंदाजी करताना लिटन दासला चांगली सुरुवात मिळाली होती.

मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो १३ धावांवर बाद होऊन माघारी परतला. दरम्यान त्याला बाद करण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने अविश्वसनीय झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना ५० वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला होता. त्यावेळी षटकातील चौथ्या चेंडूवर लिटन दासने स्टेपआऊट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला.

रोहित शर्मा मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत होता. त्याने मिड ऑफ जवळजवळ क्लियर केलं होतं. मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना त्याने परफेक्ट टायमिंगला उडी मारली आणि एकाच हाताने शानदार झेल घेतला. त्याने टिपलेला हा झेल पाहून गोलंदाज सिराजसह शुभमन गिललाही आश्चर्याचा धक्का बसला.

Rohit Sharma Catch: नाद करा पण हिटमॅनचा कुठं! हवेत उडी मारत घेतला एका हाताने कॅच, VIDEO एकदा पाहाच
IND vs BAN 2nd Test, Day 4: चौथ्या दिवशीही पावसाची बॅटिंग? कानपूरमधून समोर आली मोठी अपडेट

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशकडून प्रथम फलंदाजी करताना जाकीर हसन शून्यावर माघारी परतला. त्यानंतर शदमन इस्लाम २४ धावांवर माघारी परतला. कर्णधार शांतोला ३१ धावा करता आल्या. तर मुशफिकुर रहीम ११ आणि लिटन दास १३ धावांवर माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com