Rohit sharma: बेल्सची आदला-बदली आणि मग जादूची फुंकर...; भर मैदानात रोहित शर्माने केली मॅजिकल ट्रिक

Rohit sharma India vs Bangladesh 1st Test: रोहित मैदानावर किंवा मैदानाबाहेर त्याच्या मनोरंजक स्वभावासाठी देखील चर्चेत असतो. असाच बांगलादेशाविरूद्धच्या पहिल्या सामन्यात रोहितचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Rohit sharma magical trick
Rohit sharma magical tricksaam tv
Published On

सध्या भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील पहिला सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात आला आणि यामध्ये भारताने २८० रन्सने विजय देखील मिळवला. या सामन्याचे खरे हिरो ठरले ते रविचंद्रन अश्विन आणि ऋषभ पंत. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

रोहित शर्माच्या कृत्यावर सर्वांची नजर

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. याशिवाय रोहित मैदानावर किंवा मैदानाबाहेर त्याच्या मनोरंजक स्वभावासाठी देखील चर्चेत असतो. अशीच एक घटना बांगलादेश विरूद्धच्या सामन्यादरम्यान घडली आहे. यामध्ये रोहित शर्माने जादू केल्याचं, सोशल मीडियावर म्हटलं जातंय.

भर मैदानात रोहित शर्माने केली जादू?

बांगलादेशाविरूद्ध पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा मस्करीच्या मूडमध्ये दिसून आला. चेन्नई टेस्टच्या शेवटच्या दिवशी फिल्डींग करताना रोहितचा बेल फ्लिप करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा स्टम्पवरील बेल्स फ्लिप करताना दिसतोय. यावेळी स्टंपच्या काहीसा दूर जाऊन विकेटकडे बघून विचित्र पद्धतीने फुंकर मारली.

दरम्यान रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांना पुन्हा एकदा रोहितचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून ते विविध कमेंट्स करतायत.

पुन्हा फेल झाले रोहित-कोहली

पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा करण्यात आली होती. मात्र हे दोन्ही फलंदाज दोन्ही डावांमध्ये फ्लॉप झाल्याचं दिसून आलं. रोहितला पहिल्या डावात केवळ 6 आणि दुसऱ्या डावात 5 धावा करता आल्या. त्याचवेळी विराट कोहलीनेही पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 17 धावा करत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे दुसऱ्या टेस्टमध्ये या दोन्ही फलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष असेल.

Rohit sharma magical trick
WTC Point Table: फायनल गाठण्यासाठी भारताला अजून किती सामने जिंकावे लागणार? पाहा कसं आहे समीकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com