AFG vs SA,1st ODI: अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच हरवलं

Afghanistan vs South Africa, 1st ODI: अफगाणिस्तानने पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला आहे.
AFG vs SA,1st ODI: अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच हरवलं
AFGHANISTANTWITTER
Published On

Afghanistan Beat South Africa: अफगाणिस्तान क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. फजल हक फारुखी आणि अल्लाह गजनफरच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा बांगलादेशने ६ गडी राखून धुव्वा उडविला आहे.

दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मलिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत अफगाणिस्तानने १-० ची आघाडी घेतली आहे. या सामन्यात मजबूत बॅटिंग लाईनअप असलेला दक्षिण आफ्रिकेला अवघ्या १०६ धावांपर्यंत मजल मारता आली. हे आव्हान अAFG vs SA,1st ODI: अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच हरवलं

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचे पाहायला मिळाले. अवघ्या ३६ धावांवर सुरुवातीचे ७ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर संघाच्या शेपटीने संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. शेवटी मुल्डरने ५२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. मात्र संघातील इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात कमी धावसंख्येची नोंद झाली.

AFG vs SA,1st ODI: अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच हरवलं
IND vs BAN: बांगलादेशाने जिंकला टॉस, भारत करणार फलंदाजी; चेन्नईचं पीच कोणाला ठरणार फायदेशीर?

गोलंदाजांची कमाल

अफगाणिस्तान संघातील अल्लाह गजनफर आणि फजल हक फारुखी यांनी दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग लाईनअप उद्ध्वस्त केली. या दोन्ही गोलंदाजांनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या ७ फलंदाजांना माघारी धाडलं. अल्लाह गजनफरने ३ तर फजहलक फारुखीने ४ फलंदाजांना बाद केलं. या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी आपल्या स्पेलमध्ये अवघ्या २० धावा खर्च केल्या.

AFG vs SA,1st ODI: अफगाणिस्तानने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच हरवलं
IND vs BAN, 1st Test: विराट-रोहित ६-६, गिल ०, तासभरातच टॉप ऑर्डर कोसळली, बांगलादेशचा 24 वर्षीय गोलंदाज पडला भारी

अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १०७ धावा करायच्या होत्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना या संघाची सुरुवातही तितकी खास नव्हती. या सामन्यात अफगाणिस्तानला शून्यावर पहिला धक्का बसला. सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. एकीकडे अफगाणिस्तानचे फलंदाज डाव सांभाळून फलंदाजी करत होते, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज पूर्ण जोर लावून गोलंदाजी करत होते. हा सामना जिंकून अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com