AFG vs NZ: BCCI मुळे जगात मान झुकली, ९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दैना, अफगाण-किवी खेळाडू नाराज!

Afghanistan vs New Zealand Test: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना एकही चेंडू न टाकता समाप्त झाला आहे.
AFG vs NZ: BCCI मुळे जगात मान झुकली, ९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दैना, अफगाण-किवी खेळाडू नाराज!
afg vs nztwitter
Published On

AFG vs NZ, Greater Noida: अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना होणार होता. मात्र हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आहे. सामन्यातील पहिल्या दिवसापासूनच मैदान खेळण्यासाठी उपलब्ध नव्हतं.

पावसामुळे दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठीही मैदानात येता आलं नाही. हा सामना रद्द होताच एक मोठा रेकॉर्ड बनवला गेला आहे. जे गेल्या ९१ वर्षांत कधीच घडलं नव्हतं, ते हा सामना रद्द झाल्यानंतर घडलं आहे.

गेल्या ९१ वर्षांत एकही चेंडू न टाकता समाप्त होणारा हा आशियातील पहिलाच सामना ठरला आहे. आतापर्यंत एकूण ७ कसोटी सामने एकही चेंडू न टाकता समाप्त झाले आहेत. मात्र हे सर्व सामने परदेशात झाले होते.

दरम्यान एकही चेंडू न टाकता समाप्त होणारा हा आशियातील पहिलाच सामना ठरला आहे. यापूर्वी १९९८ मध्येही भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यातील पाचही दिवस जोरदार पाऊस होता. त्यामुळे नाणेफेक न होताच खेळाडूंना पाचही दिवस ड्रेसिंग रुममध्ये बसून राहावं लागलं होतं.

AFG vs NZ: BCCI मुळे जगात मान झुकली, ९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दैना, अफगाण-किवी खेळाडू नाराज!
IND vs BAN बांगलादेश मालिकेसाठी विराट- रोहित चेन्नईत दाखल; PHOTO व्हायरल

एकही चेंडू न टाकता रद्द होणाऱ्या कसोटी सामन्यांची यादी

कसोटी क्रमांक ३४- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मॅन्चेस्टर, हा सामना पावसामुळे रद्द होणारा पहिलाच सामना होता. या सामन्यात टॉस झाला नव्हता.

कसोटी क्रमांक २६- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड , हा सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या सामन्यातही टॉस झाला नव्हता.

कसोटी क्रमांक ६७५ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, या सामन्याला सुरुवात होणार होती त्यावेळी सर्व खेळाडू मैदानात जात होते.नेमकं त्याचवेळी पावसाने हजेरी लावली. त्यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आणि एमसीसी अधिकारी यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी हा सामना मर्यादीत षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

AFG vs NZ: BCCI मुळे जगात मान झुकली, ९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दैना, अफगाण-किवी खेळाडू नाराज!
AFG vs NZ: 'आम्ही परत कधीच येणार नाही..' पाऊस नसतानाही सामन्याला उशीर,अफगाणिस्तानचा दिग्गज भडकला

कसोटी क्रमांक १११३- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, डुनेडिन, जोरदार पाऊस असल्यामुळे हा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

कसोटी क्रमांक ११४०- इंग्लंड विरुद्ध वेस्टइंडीज, गयाना, हा सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

कसोटी क्रमांक १४३४- पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, हा सामनाही टॉस न होताच पावसामुळे रद्द करण्यात आला होता .

न्यूझीलंड विरुद्ध भारत- हा सामना तिसऱ्या दिवशी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड - हा सामना देखील पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com