IND vs BAN Bangladesh Elected to Bowl first after Winning Toss: अखेर क्रिकेट प्रेमींना ज्या दिवसाची उत्सुकता होती तो दिवस आज आला. आजपासून भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना रंगणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असून बांगलादेशाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या मैदानाच पीच कसं आहे. यावेळी कोणाला या पीचचा फायदा होणार आहे, ते पाहूयात.
चेपॉकचं मैदान नेहमी स्पिनर्ससाठी फायदेशीर ठरतं, असं मानलं जातं. मात्र एका रिपोर्टनुसार, यावेळी हे पीच वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
यावेळी चेन्नईच्या मैदानावर वेगवान गोलंदाजाना चांगली मदत मिळू शकते. ESPNcricinfo च्या अहवालानुसार, चेपॉकमध्ये 9 प्रकारचे पीच असून 3 पीच हे लाल मातीचं आहे. ही माती मुंबईहून आणली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टेस्ट सामना या तीन लाल मातीच्या पीच पैकी एकावर खेळवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाल मातीचं पीच वेगवान गोलंदाजांसाठी देखील उपयुक्त ठरणार आहे. कारण नवीन चेंडू याठिकाणी खूप स्विंग होतो.
आता सर्व चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, पीचसाठी भारताने लाल मातीचा निर्णय का घेतला? दरम्यान टीम इंडियाला या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया विरूद्ध ५ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे. त्या ठिकाणी वेगवान गोलंदाजांना बाऊंसमध्ये मदत मिळू शकते. या सिरीजचं महत्त्व लक्षात घेता लाल मातीचा वापर करण्यात आला आहे.
एकूण टेस्ट सामने- १३
भारताचा विजय-११
बांगलादेशाचा विजय- ०
ड्रॉ - २
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.