Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पार्टी आता शरद पवार गटात विलीन होणार?

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 30 september 2024: आज गुरुवार दिनांक ३० सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अक्षय शिंदे इन्काउंटर प्रकरण, मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहराचे पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पार्टी आता शरद पवार गटात विलीन होणार? 

महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पार्टी आता शरद पवार गटात विलीन होण्याची शक्यता

राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार

येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडणार

राज्यातील बीआरएस पार्टीच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत पार पडली बैठक

बदलापूर अत्याचार प्रकरण : उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या अटकपूर्व जामीवर उद्या सुनावणी 

- शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या अटकपूर्व जामीनावर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

- या सुनावणीत अटकपूर्व जामीन फेटाळण्याबाबत वकील अमित कटारनवरे युक्तिवाद करणार आहेत.

- या दोघांना अद्याप अटक का करण्यात आली नाही? याबाबत कटारनवरे न्यायालयात प्रश्न उपस्थित करणार आहेत.

PM नरेंद्र मोदींचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना फोन केला.

इस्रायल - हिजबुल्लाह, हमास, हौथी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

दहशतवादाला जगात थारा असता कामा नये, मोदींचे विधान

सर्व इस्रायली ओलिस नागरिकांची सुटका व्हायला हवी, मोदींची भूमिका

शांतता आणि स्थैर्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना भारताचा पाठींबा असेल, नरेंद्र मोदींचे नेत्यानाहू यांना आश्वासन

mira bhayandar : मीरा भाईंदरमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

मीरा-भाईंदर मध्ये विकास कामांच्या लोकार्पणासाठी आलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला शरद पवार गटाच्या वतीने मीरा-भाईंदर मधील पाण्याच्या समस्या, रस्त्यावरील खड्डे, घनकचरा निविदा घोटाळा, सार्वजनिक शौचालय घोटाळा , मालमत्ता करातील वाढ यासाठी काळे झेंडे दाखवण्यात आले. शहरात होणारे घोटाळे भ्रष्टाचार आणि समस्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत. यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष विक्रम तारे पाटील आणि कार्याध्यक्ष गुलाम नबी फारुकी यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर ठाणे आणि कल्याण ठाणे मतदारसंघाचा घेणार आढावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर ठाणे आणि कल्याण ठाणे मतदारसंघाचा घेणार आढावा..

विधानसभेच्या निमित्ताने ठाणे आणि परिसराचा उद्धव ठाकरे तीन दिवस आढावा बैठक घेत असल्याची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे परिसरात सध्या उद्धव ठाकरे यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं असल्याने काय असेल त्यांची रणनीती? याची उत्सुकता

western highway traffic : पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरीकडून दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. अर्धा तासाच्या अंतरासाठी सव्वा तासांचा वेळ लागत आहे. घरी जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

Kalyan News : कल्याण पश्चिममध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर

कल्याण पश्चिममध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदे गटांनी लावलेल्या नवरात्री उत्सवाचा बॅनर काढून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या बॅनर लावल्याने शिंदे गटातील महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क कार्यालय बाहेर शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ कार्याला बाहेरच खुर्ची टाकून ठिय्या केला.

Ajit Pawar Group : अजित पवार गटाचे जनसमान यात्रा उद्या बीडच्या परळी आणि माजलगाव शहरात

अजित पवार गटाची जनसमान यात्रा उद्या बीडच्या परळी आणि माजलगाव शहरात दाखल होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार जनसमान यात्रेची जाहीर सभा होणार आहे. परळी आणि माजलगावमध्ये भव्य दुचाकी रॅली निघणार आहे. परळीत धनंजय मुंडेंकडून शक्ती प्रदर्शन, स्वागताची जय्यत तयारी, मोठमोठे होर्डिंग आणि बॅनर्सने परळी नगरी सजली आहे.

Haji Arfat Shaikh : हाजी अराफत शेख भाजपच्या पदाचा राजीनामा देणार?

भाजप नेते हाजी अराफत शेख भाजप पदाचा राजीनामा देणार सूत्राची माहिती

मुस्लिम समाज विरोधात भाजप नेते नितेश राणे वारवार भूमिका घेत आहेत

त्यामुळे हाजी अराफात शेख नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर

ठाण्यातील कासारवडवली येथील वालावलकर मैदानात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक ठाणे महापालिका मुख्यालय येथे झाली.

Indapur News : ठरलं! अॅड राहुल मखरे शरद पवार गटात पक्षात प्रवेश करणार

बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड राहुल मखरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांचे राहुल हे पुत्र आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होत आहे.

 Baramati News : बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ

बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला आहे. एका सभासदाने इतर सभासदांना संबोधित करताना माकडांनो असा उल्लेख केला. त्यानंतर सर्व सभासदांनी निषेध केला. कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी सभासदांना शांत केले. सभेतील खाली बसलेले सभासद उठून गोंधळ घालू लागले.

Beed News : बीडच्या अंबाजोगाईजवळ बसला भीषण अपघात

बीडच्या अंबाजोगाईजवळ अहमदपूरहुन संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झालाय. रस्त्याच्या कडेला ही बस उलटली आहे. यात 10 प्रवासी जखमी झालेत. चालक आणि अन्य एक प्रवाशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर केज येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.

Sanjana jadhav accident : माजी केंद्रीय मंत्री दानवेंच्या मुलीच्या कारला अपघात

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना हर्षवर्धन जाधव यांच्या कारला रांजणगाव फाट्‍याजवळ संभाजीनगर सीमेवर समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या पीकअपने जोरदार धडक दिली. या अपघातात संजना जाधव यांच्या कारचे नुकसान झाले. सुदैवाने कारचालकासह कारमधील सर्व जण बचावले. सर्व सुखरूप आहेत.

Pune News :  पुण्यातील खडकवासला धरणावर कपडे धुण्यासाठी गर्दी

पितृ पंधरवड्यानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होतेय. त्यानंतर लगेचच दिवाळीचा सण येतो. याच निमित्ताने अनेक ठिकाणी घरात आता स्वच्छता मोहिमेला सुरुवात गेल्याचं पाहायला मिळतंय.

Mumbai Fire : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गांधीनगरमध्ये बसला भीषण आग

JVLR च्या गांधी नगर जंक्शन वर बेस्ट बस ला भीषण आग

चालकाच्या प्रसंग्धवणाने मानवी जीवितहानी टळली

अग्निशमन दल घटना स्थळी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी नवी मुंबई दौऱ्यावर

उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईच्या दौऱ्यावर.

नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशन सेंटर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक.

कोकण आणि ठाणे प्रांतातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद.

बैठकीत कोकण ठाणे विभागाचा घेणार आढावा.

अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी समाज आक्रमक; लातूर-बार्शी महामार्ग अडवला

धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करत आदिवासी आंदोलक आक्रमक झाले आहेत. सरकारने धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देणारा जीआर काढण्याची भूमिका मागे घ्यावी तसेच, प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लातूर बार्शी महामार्गा अडवत आंदोलकांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणा केल्या आहेत.

रावसाहेब दानवे यांच्या मुलीच्या कारला अपघात; पिकअपची जोरदार धडक

माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या तसेच कन्नडच्या माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव यांच्या कारचा अपघात झाला आहे. त्या सोयगाव मतदारसंघातील नियोजित दौऱ्यावर जात होत्या. त्यावेळी धुळे सोलापूर हायवेवर चाळीसगावच्या मागे रांजणगाव फाट्यावर संजना जाधव यांच्या कारचा आणि पिकअपचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत संजना जाधव आणि कारमधील सर्व सदस्य सुखरूप आहेत.

Nashik News: धनगरांना आदिवासींमधून आरक्षण द्यायला आदिवासी संघटनांचा विरोध

धनगरांना आदिवासींमधून आरक्षण द्यायला आदिवासी संघटनांचा विरोध

रस्त्यावर उतरत मुंबई नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी संघटना आक्रमक

धनगरांना आदिवासींमधून आरक्षण नको आणि पेसा भरतीच्या मागणीसाठी आदिवासी संघटनांच आंदोलन

Pune News: मणिपूरमधील नागरिकांनी घेतली शरद पवारांची भेट

मणिपूरमधील नागरिकांनी घेतली शरद पवारांची भेट.

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांनी केंद्राशी बोलण्याबाबत केली मागणी.

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींशी बोलतो आश्वासन दिल्याची माहिती.

३ जणांच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट.

Pune News: बेशिस्त पुणेकरांवर महापालिकेची कारवाई, ३ कोटींचा दंड केला वसूल

बेशिस्त पुणेकरांवर महापालिकेची कारवाई.

तीन कोटीचा दंड केला वसूल.

उघड्यावर कचरा टाकणाऱ्या ४७ हजार जणांवर कारवाई.

उघड्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे, कचरा वर्गीकरण करून न देणे, रस्त्यावर थुंकणे अशा कारणामुळे शहर अस्वच्छ होत आहेत.

Nepal Flood: नेपाळमधील पूराचा फटका बिहारला, १३ जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी वाढली

नेपाळमध्ये आलेल्या पुराचा सर्वात जास्त फटका बिहार राज्याला.

बिहारमधील काही जिल्ह्यांना पुराचा फटका.

13 जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ.

मुजफ्फरपुर कटराजवळ असलेल्या पॉवर प्लांटमध्ये पाणी शिरल्याची माहिती.

प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात

नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचं आवाहन.

Ajit Pawar: झारखंडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, एकमेव आमदार भाजपच्या वाटेवर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का

अजित पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार कमलेश सिंह भाजपमधे प्रवेश करणार

3 ऑक्टोबरला सिंह यांचा भाजप प्रवेश निश्चित

Maharashtra Politics: बबन शिंदे २ ऑक्टोबरला शरद पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती

माढाचे आमदार बबन शिंदे पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार सूत्रांची माहिती.

शरद पवारांनी जयंत पाटील यांना भेटा अशा दिल्या सूचना.

बबन शिंदे यांचा २ ऑक्टोबरपर्यंत पक्ष प्रवेश होवू शकतो

अजित पवारांना माढा विधानसभेत धक्का बसणार.

बबन शिंदे पुन्हा तुतारी हाती घेणारं सूत्रांची माहिती.

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात लढण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली

राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात लढण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढली

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार गटाकडे इच्छुकांचे गर्दी

राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवारांकडे अर्जांचा ढीग

या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी

Baldapur News अक्षय शिंदेला दफन केलेल्या ठिकाणी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला उल्हासनगरच्या ज्या शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आलं आहे, तिथे पोलिसांकडून रात्रंदिवस खडा पहारा ठेवण्यात आला आहे. सोबतच अक्षय शिंदेला दफन केलेल्या ठिकाणी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे.

Delhi News: दिवाळीपूर्वी राजधानी दिल्ली खड्डे मुक्त होणार, नव्या मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश 

दिवाळीपूर्वी राजधानी दिल्ली खड्डे मुक्त होणार.

मुख्यमंत्री अतिशी यांनी आज सकाळी केली रस्त्यांची पाहणी.

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांनीही केली रस्त्यांची पाहणी.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे रस्ते खड्डे मुक्त होणार.

पाहणी दरम्यान अतिशी यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारीही होते उपस्थित.

Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल १५ ते २० मिनिटं उशिराने 

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये.

सर्व गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणाऱ्या नागरिकांना लेटमार्क लागणार.

6 व्या मार्गीकचे काम सुरु असल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम.

Maharashtra Politics: रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसच्या वाटेवर

पश्चिम महाराष्ट्रातील मोठी बातमी

रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता.

दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट.

माढा विधानसभा लढवण्याबाबत चाचणपणी सुरू.

Pune News: अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला

अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे शरद पवारांच्या भेटीला.

आमदार बबन शिंदे माढाचे आमदार.

शरद पवारांबरोबर करणार चर्चा.

बबन शिंदे तुतारी हाती घेणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com