Vajra Super Shot IPL 2025 X
Sports

पहलगाम हल्ल्यानंतर मोठं पाऊल! आता IPL 2025 मधील खेळाडूंना मिळणार डबल सुरक्षा, वज्र सुपर शॉट म्हणजे नेमकं आहे तरी काय?

Vajra Super Shot IPL 2025 : पहलागाम दहशतवादी हल्ल्यानंतर आयपीएलमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव वज्र सुपर शॉट ही यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. वज्र सुपर शॉट काय आहे? ते कसे काम करते? जाणून घेऊयात..

Yash Shirke

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्लाचे पडसाद क्रिकेट जगतावरही पाहायला मिळत आहेत. सध्या देशात आयपीएल सुरु आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ठिकठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ज्या स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने खेळवले जात आहेत, तेथे सुरक्षेसाठी अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. या सिस्टीमचे नाव वज्र सुपर शॉट असे आहे.

शनिवारी (२६ एप्रिल) ईडन गार्डन्सवर झालेल्या कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यामध्ये वज्र सुपर शॉट या सिस्टीमचा वापर करण्यात आला होता. आयपीएल ही जगतील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक आहे. सध्या आयपीएलमध्ये अनेक मोठे खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये याची बीसीसीआय काळजी घेत आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बीबीबीएसने (बिग बँग बूम सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड) शनिवारी आयपीएल २०२५ च्या सामन्यांदरम्यान हवाई सुरक्षेसाठी वज्र सुपर शॉट ही स्वदेशी अँटी-ड्रोन प्रणाली तैनात करण्यात आल्याची घोषणा केली. मंगळवारी (२२ मार्च) पहलगाममध्ये झालेल्या हल्यानंतर आयपीएलच्या सामन्यादरम्यान सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

काय आहे वज्र सुपर शॉट?

वज्र सुपर शॉट हे हलके, हाताने हाताळता येणारे अँटी-ड्रोन शस्त्र आहे. ४ किलोमीटर अंतरापर्यंतचे ड्रोन शोधण्यासाठी आणि त्यांच्या सिग्नलमध्ये व्यत्यय आणण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. आयपीएलदरम्यानचे संभाव्य धोके टाळले जावे यासाठी ही सिस्टीम तयार करण्यात आली आहे. पोर्टेबिलिटी आणि अ‍ॅडॉप्टिव्ह फ्रिक्वेन्सी जॅमिंग हे या यंत्रणेचे वैशिष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिकेट विश्वावर शोककळा, ऑस्ट्रोलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचं निधन

Jai Jawan Govinda Pathak: नऊ थरांनंतर आता दहा थरांचा विक्रम घडवण्यासाठी जय जवान पथक सज्ज|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Javed Akhtar: 'तुझ्या पूर्वजांनी ब्रिटिशांचे बूट चाटले...'; 'पाकिस्तानी' म्हटल्याने जावेद अख्तर भडकले, ट्रोलरची केली बोलती बंद

Green Tea: रोगप्रतिकारकशक्ती आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे ग्रीन टी

SCROLL FOR NEXT