Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Pune Satara Navale Bridge Accident: पुणे सातारा महामार्गावरील नवले ब्रिजवर अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज पुन्हा एकदा ब्रिजवर काल पलटी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

पुण्यातील नवले पुलावर अपघातांचे सत्र सुरुच आहे. या पुलावरुन प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहेत. आजदेखील पुन्हा अपघात झाला आहे. एक कार पलटी झाली आहे. भूमकर ब्रिजवर एका कारचा भीषण अपघात झाला.त्यानंतर ही कार पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नाही. ड्राइव्हरने स्वतःच क्रेन बोलावून वाहन काढून घेत आहे.परंतु नवले ब्रिजवरुन जाताना नेहमीच अपघात होत असतात. त्यामुळे या पुलाचे व्यवस्थित काम करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला होता. देवदर्शनावरुन येणाऱ्या कुटुंबाच्या कारचा अपघात झाला. यात ४-५ जणांचा दुदैवी मृत्यू झाला होता. त्यानंतरही या ब्रिजचे योग्य काम न झाल्याने अपघाताची संख्या वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com