
IPL 2025 : पंजाब किंग्सने एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकली नाहीये. अनेकदा हा संघ पॉईंट्स टेबलवर शेवटच्या क्रमांकावर होता. पण श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वामध्ये आणि रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनात पंजाबने आयपीएल २०२५ मध्ये शानदार कामगिरी केली आहे. पण पंजाब यंदाच्या सीझनमध्ये ट्रॉफी जिंकू शकणार नाही असा दावा एका माजी क्रिकेटपटूने केला आहे. त्याने पंजाबचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगच्या निर्णयांवरही शंका घेतली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना काल ईडन गार्डन्सवर खेळवला गेला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने २०१ धावा केल्या. २०२ धावांचे ध्येय गाठण्यासाठी केकेआरचे खेळाडू मैदानात उतरले. पण दुसऱ्या इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीला पाऊस सुरु झाला. पुढे पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि दोन्ही संघांना १-१ गुण मिळाला. या सामन्यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने ट्वीट केले.
'पंजाबचा संघ या सीझनमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकणार नाही, असे मला मनापासून वाटते. पंजाबची फलंदाजी सुरु असतान प्रशिक्षकाने नेहाल वधेरा आणि शशांक सिंग या इनफॉर्म भारतीय खेळाडूंना फलंदाजीसाठी पाठवले नाही. त्यांनी त्यांच्या परदेशी खेळाडूंवर विश्वास ठेवला. यावरुन भारतीय खेळाडूंच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास कमी असल्याचे दिसून आले. असेच सुरु राहिले तर ते पॉईंट्स टेबलवर वरच्या स्थानावर असतील, पण आयपीएलचे जेतेपद त्यांच्यापासून दूर होईल', असे ट्वीट मनोज तिवारीने केले आहे.
नाव न घेता मनोज तिवारीने ग्लेन मॅक्सवेल आणि रिकी पॉन्टिंग यांच्यावर निशाणा साधला. मॅक्सवेल यावर्षीही आयपीएलमध्ये फ्लॉप झाला आहे. तरीही त्याला सतत संधी दिली जात आहे, असे मनोज तिवारीने अधोरेखित केले आहे. परदेशी खेळाडूंमुळे भारतीय खेळाडूंना संधी मिळत नसल्याचे त्याने म्हटले. आयपीएल २०२५ मध्ये मॅक्सवेलने ६ सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. यात त्याने फक्त ४८ धावा केल्या आहेत. खराब कामगिरीवरुन वीरेंद्र सेहवागने देखील मॅक्सवेलवर जहरी टीका केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.