Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Monalisa-Farman Khan Wedding : महाकुंभ मेळ्यामुळे व्हायरल झालेली मोनालिसा नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. तिने पळून जाऊन लग्न केले. तिच्या नवऱ्याने त्यांची प्यारवाली लव्ह स्टोरी सांगितली आहे.
Monalisa-Farman Khan Wedding
Monalisa Love Storysaam tv
Published On
Summary

महाकुंभ मेळ्यामुळे प्रसिद्ध झालेली मोनालिसाने महाराष्ट्रीयन मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली.

मोनालिसाच्या नवऱ्याने त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे.

मोनालिसा आणि फरमानची भेट शूटिंगच्या सेटवर झाली.

2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. या महाकुंभ मेळ्यात आपल्या मोनालिसाने (Monalisa Bhosle) आपल्या डोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कुंभमेळ्यात मोनालिसा रूद्राक्ष माळा विकायची. त्यानंतर मोनालिसा कायम चर्चेत राहिली. आधी चित्रपटामुळे तर आता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. मोनालिसाने नुकतीच आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे.

मोनालिसा भोसलेने महाराष्ट्रीयन मुस्लीम बॉयफ्रेंड फरमान खानसोबत पळून जाऊन लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 11 मार्चला दोघं विवाह बंधनात अडकले. मोनालिसाने कुटुंबाच्या विरोधात जाऊन फरमानशी लग्न केले, त्यामुळे मोनालिसाने पोलीसांकडे संरक्षणाची मागणी केली. मोनालिसाने आंतरधर्मीय लग्न केले आहे.

मोनालिसाची प्रेम कहाणी

मीडियाशी बोलताना मोनालिसाने सांगितले की, "आम्हाला केरळमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला नयनार मंदिर आवडले. केरळचे लोक खूप चांगले आहेत." त्यानंतर मोनालिसाच्या नवऱ्याने त्यांची लव्ह स्टोरी सांगितली आहे. फरमान खान म्हणाला की, "केरळमधील लोक खूप पाठिंबा देणारे आहेत. आम्ही ६ महिने एकमेकांना डेट केले. 6 महिन्याचे प्रेम आमच्यासाठी 60 वर्षांप्रमाणे आहे. म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटलो. एकत्र काम केले आणि नंतर आम्ही बोलू लागलो आणि मोनालिसाने मला प्रपोज केले. मी पहिल्यांदा तिला नाही म्हटले, पण मोनालिसाने मला पटवून दिले."

मोनालिसा आणि फरमान अनेक वेळापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी केरळमध्ये लग्नगाठ बांधली. मोनालिसा मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची आहे. तर फरमान खान मूळचा महाराष्ट्रातील आहे. तसेच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. मोनालिसाच्या लग्नाला तिच्या कुटुंबाचा विरोध होता, त्यामुळे मोनालिसा आणि फरमानने घरच्यांच्या विरोधात पळून जाऊन लग्न केले. मोनालिसा आणि फरमानने आधी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील अरुमानूर नैनार मंदिरात लग्न केले.

Monalisa-Farman Khan Wedding
Famous Actress Wedding : टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाह बंधनात, लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com