ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मिताली मयेकर ही मराठीतील प्रसिद्द अभिनेत्री आहे.
मिताली मयेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या चाहत्यांसोबत फोटो, व्हिडिओ आणि वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण शेअर करत असते.
मितालीने २०२१ साली अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत लग्न केले.
मितालीने याआधी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
नुकताच मराठी चित्रपटसृष्टीतील फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा पार पडला .
मिताली मयेकरने या सोहळ्याकरिता बोल्ड आणि ब्यूटीफुल लूक केला होता.
मितालीने सिल्क साडीपासून शिवलेला बॅकलेस जमसूट परिधान केला होता.
साडीपासून शिवलेला बॅकलेस जमसूटवर मितालीने सुंदर हिऱ्यांचे दागिने परिधान केले होते.