ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुलाबाचे फूल फक्त सौंदर्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
तर चला जाणून घेवूया गुलाबाची फुले खाणे कसे फायदेशीर ठरू शकते.
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सेंद्रिय तेल असते जे मन शांत करते. यामुळे गुलाबाचं सेवन किंवा गुलकंद खाल्ल्यास तणाव आणि मानसिक थकवा कमी होतो.
गुलाबामध्ये फायबर्स असतात, जे अपचन, गॅसेस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात. रोज सकाळी गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास पचनक्रिया बळकट होते.
गुलाबाचं सेवन शरीरातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे यकृत आणि रक्तशुद्धीसाठी गुलाब फायदेशीर ठरतो.
गुलाबाच्या पाकळ्या चघळल्याने तोंडाला सुगंध येतो व दुर्गंधी दूर होते. त्यामुळे गुलाब हे नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून काम करते.